अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :-कोरोना व्हायरसचा डेल्टा व्हेरिएंट इतरांपेक्षा अधिक गंभीर आहे. कांजण्यांप्रमाणे तो पसरत आहे. अमेरिकन आरोग्य प्राधिकरणाच्याअंतर्गत दस्तऐवजाचा हवाला देत, मीडिया रिपोर्ट्समध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे.

कोरोना लसीकरण झालेले आणि एकही लस न घेतलेल्या दोन्ही गटाकडून या व्हायरसचा प्रसार केला जाऊ शकतो, असं सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन अर्थातच सीडीसीने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे लसीकरण घेतलेल्या लोकांना देखील विशेष काळजी घेण्याच गरज आहे.

द वॉशिंग्टन पोस्टने देखील याबाबतचं वृत्त दिलं आहे. जगभरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. भारतात दुसरी लाट ओसरत असताना आणि तिसऱ्या लाटेचा धोका असताना आता मोठी अपडेट कोरोना संदर्भातली समोर येत आहे. कोरोनाच्या आतापर्यंतच्या व्हेरिएंटमध्ये डेल्टा व्हेरिएंट सर्वात जास्त धोकादायक असल्याचं सांगितलं जात आहे.

त्यामुळे वैज्ञानिकांकडून धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.जगभरातल्या सर्वच देशांनी आपापल्या देशातील कोरोना लसीकरणाची गती वाढवावी अन्यथा डेल्टा व्हेरिएंट अधिक जीवघेणा ठरु शकतो असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे.

डेल्टा व्हेरिएंटवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवं अन्यथा जगभरातील परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता आहे असंही जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे.