सध्या राज्यामध्ये प्रचंड प्रमाणात उष्णता असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पारा 40° सेल्सिअसच्या पार गेलेला आहे.त्यामुळे सगळीकडे प्रचंड प्रमाणात उष्णता जाणवत असून नागरिक हैराण असल्याची परिस्थिती आहे. त्यातच आता राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावत असून
काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी प्रचंड उकाडा अशी वातावरणाची सद्यस्थिती आहे. त्यातच आता महाराष्ट्रामध्ये 7 ते 11 मे दरम्यान मुसळधार स्वरूपाचा अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज हवामान अभ्यास पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.
पंजाबरावांनी वर्तवला अवकाळी पावसाचा अंदाज
राज्यामध्ये कुठे उन्हाचा तडाखा तर कुठे पाऊस अशी सध्या परिस्थिती असून त्यातच आता सात ते 11 मे च्या दरम्यान राज्यात मुसळधार अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे. 6 मे पर्यंत राज्यात हवामान कोरडे राहील. परंतु त्यानंतर मात्र सात मे ते अकरा मे दरम्यान राज्यात पावसाची शक्यता आहे.
या कालावधीमध्ये राज्यात वादळी वारे तसेच विजांचा गडगडाट, गारपीटीसह पाऊस पाहायला मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी 7 मेच्या आधी शेतातील हळद किंवा कांदा काढलेला असेल तर तो व्यवस्थित झाकून ठेवणे गरजेचे आहे असा देखील सल्ला त्यांनी दिला आहे.
मराठवाड्यात देखील 7 मे पासून पुढील पाच दिवस जोरदार अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सहा मे पर्यंत कांदा, कापूस, हळद इत्यादी पिकांची काढणी करून ते नीट झाकून ठेवणे गरजेचे असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.
या ठिकाणी आहे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज
यासोबतच पश्चिम महाराष्ट्रात देखील या पाच दिवसाच्या कालावधीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज असून हा पाऊस ऊस पिकासाठी खूप फायद्याचा ठरणार आहे. कोकणात देखील 7 मे पासून पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एवढेच नाही तर आतापर्यंत उन्हाळ्याच्या कालावधीत जो काही पाऊस झाला
त्यापेक्षा सात ते अकरा मे दरम्यान जोरदार अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज पंजाबरावांनी व्यक्त केला आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रात आठ ते 11 मे दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यासोबतच मुंबई, नाशिक आणि पुण्यात देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.