सध्या महाराष्ट्र मध्ये कुठे अवकाळी पावसाचे हजेरी तर काही जिल्ह्यांमध्ये गेल्या तीन ते चार दिवसापासून परत उष्णतेत वाढ होताना दिसून आली असून अनेक जिल्ह्यांमध्ये पारा 43 अंशापर्यंत पोहोचल्याचे चित्र आहे. म्हणजेच कुठे उन्हाचा तडाखा तर कुठे अवकाळी पावसामुळे निर्माण होणारा सुखद गारवा अशी संमिश्र परिस्थिती आपल्याला दिसून येत आहे.
तसेच आता मान्सूनचे आगमन तोंडावर आले असून देशाच्या हवामान शास्त्र विभागाने देखील मान्सूनच्या आगमनाविषयीचे अंदाज वर्तवलेले आहेत.
तसेच सगळ्यात सुखद बातमी म्हणजे यावर्षी देशांमध्ये खूप चांगला पाऊस पडेल असा देखील अंदाज आयएमडीने वर्तवला असल्यामुळे एकंदरीत समाधानाचे वातावरण दिसून येत आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये मान्सून विषयक अंदाज वर्तवताना प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी देखील त्यांचा अंदाज वर्तवलेला आहे.
काय आहे पंजाबराव डख यांचा अंदाज?
शेतकऱ्यांमध्ये विश्वासाचे नाते असलेले नाव म्हणजे प्रसिद्ध हवामान अभ्यासाक पंजाबराव डख हे होय. त्यांनी देखील मान्सूनच्या आगमनाविषयीच्या अंदाज वर्तवला असून 31 मे पर्यंत मान्सूनचे केरळमध्ये आगमन होईल अशी माहिती त्यांनी दिली आहे. यावर्षी मान्सूनचे केरळमधील आगमन हे तारखेच्या अगोदरच म्हणजेच एक जून अगोदर होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
परंतु या तारखेमध्ये चार दिवस कमी जास्त होऊ शकतात अशी देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे 28 मे ते 3 जून या कालावधी दरम्यान मान्सूनचे केरळमध्ये कधीही आगमन होण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्रातील आगमनाविषयी माहिती देताना भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे की 9 ते 16 जूनच्या दरम्यान मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन होईल.
यावर्षी महाराष्ट्र मध्ये कसा असेल पाऊस?
मागील वर्षी संपूर्ण भारतामध्ये अल निनोच्या प्रभावाने अत्यल्प पाऊस झाला होता व संपूर्ण भारतात व राज्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसला.
परंतु यावर्षी एल निनोची स्थिती या आठवड्यामध्ये संपुष्टात आली असून येणाऱ्या तीन ते पाच आठवड्यामध्ये पावसाला पोषक अशा ला नीनाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने संपूर्ण भारतामध्ये यावर्षी चांगला पाऊस होण्याची अपेक्षा आहे.