महाराष्ट्रात जूनच्या ‘या’ तारखांना होणार चांगला पाऊस! पंजाबराव डख यांनी दिली महत्त्वाची माहिती

Ajay Patil
Published:
monsoon rain

राज्यामध्ये सध्या आपण पाहिले तर एकीकडे उष्णतेचा पारा प्रचंड प्रमाणात वाढत असताना त्यासोबत मात्र अवकाळी पावसाने देखील मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ घातल्याचे चित्र आहे.

विदर्भाच्या बऱ्याच भागांमध्ये अवकाळी पावसाने गेल्या काही दिवसांपासून कहरच केला असून त्यासोबत आता उष्णतेचा लाटेचा इशारा देखील नागपूर प्रादेशिक हवामान विभागाच्या माध्यमातून देण्यात आला आहे व त्यानुसार आता 23 ते 26 मे दरम्यान पुढील चार दिवस उष्णतेची लाट राहील असा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे.

23 मे पासून पुढील 48 तास विदर्भातील अकोला, बुलढाणा, वाशिम तसेच यवतमाळ आणि अमरावती मध्ये वादळ तसेच विजांचा कडकडाट व त्यासोबत ताशी 30 ते 40 किमी सोसायटीचा वाऱ्यासह सदर जिल्ह्यांना येलो अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे. या सगळ्या संमिश्र वातावरणाच्या परिस्थितीमध्ये मान्सूनची देखील आगेकुच सुरू असून गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.

 पंजाबराव डख यांनी दिली पावसाबद्दल महत्वाची माहिती

प्रसिद्ध हवामान अभ्यासाक पंजाबराव डख त्यांनी पावसाबद्दल माहिती देताना म्हटले आहे की, राज्यातील वातावरणात बदल होत असून त्यामुळे राज्यामध्ये पावसाकरिता पोषक हवामान तयार होत असून मान्सूनचा प्रवास पाहिला तर सध्या अंदमानच्या बेटावर मान्सून दाखल झाला आहे

व पुढील तीन दिवस कोकण विभाग व त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्र इत्यादी ठिकाणी पावसाची शक्यता असल्याची माहिती पंजाबराव डख यांनी दिली असून उर्वरित ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता देखील त्यांनी वर्तवलेली आहे. त्यासोबतच पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या 30 आणि 31 मेला मान्सून केरळमध्ये दाखल होणार असून

त्यानंतर एक, दोन आणि तीन जून रोजी महाराष्ट्रात चांगला पाऊस पडण्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवलेली आहे. तसेच राज्यामध्ये मान्सूनची परिस्थिती खूप चांगली असल्यामुळे यावर्षी राज्यात आठ जूनला मान्सून सर्वत्र सक्रिय होईल असे देखील त्यांनी म्हटले आहे.

 पंजाबरावांनी पेरणीच्या दृष्टीने शेतकऱ्यांना दिला मोलाचा सल्ला

पेरणीच्या दृष्टिकोनातून हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण सल्ला दिला असून त्यांच्या मते जोपर्यंत पावसाची एक वीत ओल जमिनीत जात नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये. सध्या मान्सून करिता  पोषक वातावरण असल्याचे त्यांनी म्हटले.