Maharashtra Rain: महाराष्ट्रात 3 दिवस आहे पावसाचा आणि तुरळक ठिकाणी गारपिटीचा अंदाज! वाचा तुमच्या भागात पडेल का पाऊस?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain:- सध्या वातावरणामध्ये थंडीचे प्रमाण खूप कमी झाल्याचे सध्या चित्र आहे. परंतु या पार्श्वभूमीवर मात्र महाराष्ट्रातील काही ठिकाणी पावसाचा आणि तुरळक ठिकाणी गारपीट होईल

अशी शक्यता असून याबाबतचा अंदाज हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यांमध्ये सोमवार पर्यंत म्हणजेच आज आणि उद्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

 काय आहे माणिकराव खुळे यांचा हवामान अंदाज?

 याबाबत हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी म्हटले की, विदर्भातील जे काही सर्व 11 जिल्हे आहेत त्यामध्ये आज आणि उद्या म्हणजे सोमवार पर्यंत तीन दिवस तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह मध्यम पावसाची शक्यता असून

त्यासोबतच उंचीच्या वेगवेगळ्या पातळीवर दोन्हीही समुद्रातून येणाऱ्या आद्रतेमुळे एकंदरीत वातावरणामध्ये अस्वस्थ अवस्था देखील निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिस्थितीचा परिणाम होऊन रविवारी म्हणजेच आज अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये

आणि लगतच्या काही परिसरात तुरळक ठिकाणी अगदीच किरकोळ स्वरूपाची गारपिट होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही असं देखील त्यांनी म्हटले आहे. परंतु राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये मात्र गारपीटीची कुठलीही शक्यता नाही. तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज ढगाळ वातावरणाची व तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊस पडेल अशी शक्यता आहे.

 थंडीचे प्रमाण कसे राहिल?

 हे विदर्भातील पावसाचे वातावरण संपल्यानंतर मात्र मंगळवारपासून महाराष्ट्रातील थंडी कायमचीच जाईल अशी देखील शक्यता आहे. नंदुरबार तसेच धुळे जळगाव, छत्रपती संभाजी नगर व नाशिक या जिल्ह्यांमध्ये पहाटेचे किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त जाणवण्याची शक्यता आहे.

म्हणजेच या पाचही जिल्ह्यांमध्ये दरवर्षीप्रमाणे पहाटेच्या वेळी गारवा न जाणवता त्याऐवजी अधिक उबदारपणा जाणवेल. म्हणजेच थंडी तर लवकर जाईलच परंतु त्या ऐवजी त्या ठिकाणी अधिक उष्णता जाणवायला सुरुवात होईल असा अंदाज देखील श्री.माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे.