अहमदनगर, नासिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, अन ‘या’ जिल्ह्यात 29 आणि 30 मे ला पाऊस पडणार ! तुमच्या भागात कसं राहणार हवामान? पहा…


मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशमधील जळगाव, धुळे तसेच मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात अवकाळी पावसाने त्राहीमाम माजवला होता. दरम्यान आता उन्हाळी हंगाम संपणार असून लवकरच मान्सूनचे आगमन होणार आहे.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Weather Update : यावर्षी उन्हाळ्यात अवकाळी पावसामुळे उन्हाची झळ बसली नसली तरी देखील अवेळी पडलेल्या या पावसामुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचे सुरुवातीचे तीन ते चार दिवस राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळाली.

विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशमधील जळगाव, धुळे तसेच मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात अवकाळी पावसाने त्राहीमाम माजवला होता. दरम्यान आता उन्हाळी हंगाम संपणार असून लवकरच मान्सूनचे आगमन होणार आहे. भारतीय हवामान विभागाने मान्सून आगमनाची तारीख देखील जाहीर केली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार यावर्षी चार जून 2023 रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होणार आहे आणि तेथून आठ दिवसांच्या काळात मान्सून हा तळ कोकणात येणार आहे. अर्थातच यावर्षी मान्सूनचे थोडे उशिराने आगमन होणार आहे.

हे पण वाचा :- धक्कादायक ! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार नाही सातवा वेतन आयोगाची थकबाकी? वाचा…

विशेष म्हणजे मान्सूनसाठी पोषक हवामान राहिले तर मान्सून वेळेतही दाखल होऊ शकतो. अशातच मात्र राज्यातील बहुतांशी भागात मान्सूनपूर्व पावसासाठी पोषक हवामान तयार होत असल्याचा नवीन हवामान अंदाज भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून समोर आला आहे.

यानुसार 29 मे आणि 30 मे रोजी राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे मे महिन्यात उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला निश्चितच दिलासा मिळणार आहे. मात्र यामुळे शेतीकामांमध्ये खोळंबा होण्याची शक्यता आहे. सध्या शेतकरी बांधव खरीप हंगामातील पीक पेरणीपूर्वी जमिनीची तयारी करण्यात व्यस्त आहेत.

मान्सूनची चाहूल लागली असल्याने शेती कामांची लगबग वाढली आहे. मात्र आता मान्सून पूर्व पावसासाठी पोषक हवामान तयार झाले असून पुढील दोन दिवस मराठवाडा, कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हे पण वाचा :- मिसिंग लिंकमुळे मुंबई ते पुणे प्रवास होणार सुसाट, प्रवाशांच्या अर्धा तासाचा वेळ वाचणार; प्रकल्पाचे काम केव्हा होणार पूर्ण ? MSRDC अधिकारी म्हणतात….

कोणत्या जिल्ह्यात पडणार पाऊस?

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकणातील, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. निश्चितच या भागातील शेतकऱ्यांची शेती कामे या पावसामुळे खोळंबतील असा अंदाज आहे. या भागातील सामान्य जनतेला मात्र उकाड्यापासून मोठा दिलासा मिळणार आहे.

हे पण वाचा :- काय सांगता ! फक्त 3 वर्षात ‘या’ स्टॉकने दिलेत 1500% रिटर्न्स, 1 लाखाचे बनलेत 17 लाख; कोणता आहे हा शेअर, वाचा….