file photo

अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :- बँकेमध्ये पैसे भरण्यासाठी गेलेल्या एका व्यापाराच्या दुचाकीच्या डिक्कीतील २ लाख ४० हजार रुपये चोरून नेल्याची घटना घडली आहे.

या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, येथील कैलास मपलानी यांचे डायमंड एन्टरप्राईजेस नावाचे दुकान आहे.

काल दुपारच्या सुमारास ते दुकानात गेले नंतर दुकानातील कामकाज संपल्यानंतर त्यांनी त्यांची दुचाकी गाडीच्या (क्र. एमएच १६ बिके ३९३३)च्या डिक्की मध्ये दोन लाख चाळीस हजार रुपयांची रक्कम ठेऊन ते बँकेमध्ये गेले होते.

सायंकाळच्या सुमाराला स्टेशन रोडवरील युनियन बँक या ठिकाणी गाडी पार्क करून ते बँकेमध्ये विचारपूस करायला गेले. मात्र याच दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या गाडीच्या डिक्कीचे लॉक तोडून त्यामध्ये ठेवलेली २ लाख ४० हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली.

ते बाहेर आल्यानंतर गाडीच्या डिकीत ठेवलेल्या पैशाची चोरी झाली असल्याचे लक्षात आले. याबाबत त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.