file photo

अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :- आपल्याला सर्वसाधारणपणे गाय, म्हैस आणि बकरी यांचे दूध पिण्याची सवय आहे. गाढविणीच्या दुधाची आपल्याला सवय नसली तरी तिचे दूध चक्क दहा हजार रुपये लिटरने विकले जाऊ लागले आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा शहरात चक्क गाढविणीच दूध चक्क दहा हजार रुपये लिटरने भोंगा लावून विकल जातंय. दहा मिली दूध घेण्यासाठी शंभर रुपये मोजावे लागतायत. दूध आहे बहुगुणकारी शंभर रुपयाला १० मिलि याप्रमाणे हे दूध विकले जात आहे. हे लोक गाढविणीला सोबत घेऊन गल्लोगल्ली फिरत आहेत.

गाढविणीच्या दुधामुळे सर्दी, खोकला, कफ, न्यूमोनिया असे आजार होत नाहीत. मुख्यत्वे लहान मुलांना असे आजार होऊ नयेत व झाल्यास दुरुस्त होण्यासाठी पूर्वीच्या काळी असा इलाज केला जायचा, अशी माहिती नांदेड येथून गाढविणीचे दूध विक्रीसाठी आलेल्या एका व्यावसायिकाने सांगितले.

गाढविणीच्या दुधामध्ये असणाऱ्या जिवाणूच्या संख्येपैकी ८० टक्के जिवाणू हे लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरियाचे जिवाणू असतात. हे पोटाचे विकार टाळण्यासाठी महत्त्वाचे असतात.

गाढवाच्या दुधाचा वापर अलीकडे हृदयाविकार टाळण्यासाठीदेखील होत आहे, तसेच संसर्गजन्य रोग, यकृत संबंधित आजार, ताप आणि दमा या आजारातदेखील याचा औषधी म्हणून वापर होतो. गाढविणीच् दूध हे लहान मुलांसाठी मातेच्या दुधाइतकंच उपयुक्त आहे.

शंभर वर्षांपूर्वी पासून गाढविनीच दूध गुणकारी म्हणून वापरलं जातं. या दुधामुळे पोटाचे विकार टाळण्यास मदत होते. व्हिटॅमिन डी ची मात्रा अधिक असल्याने रोग प्रतिकारशक्तीही वाढते.

या दुधामुळे त्वचा मऊ मुलायम व तजेलदार होते. त्यामुळे सौंदर्य प्रसाधनामध्ये गाढविणीच्या दुधाचा वापर केला जातो. गाय,म्हैस व शेळीच्या दुधापेक्षा हे दूध सकस असल्याचे काही डॉक्टर सांगतात.