Wheat Farming : देशात सध्या रब्बी हंगामाला सुरुवात झाली आहे. मित्रांनो रब्बी हंगामात शेतकरी बांधव वेगवेगळ्या पिकांची शेती करत असतात. यामध्ये गहू हरभरा मोहरी जवस यांसारख्या पिकांचा समावेश होतो. मित्रांनो खरं पाहता रब्बी हंगामात आपल्या राज्यात गव्हाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते.

भारतातील एकूण गहू उत्पादनाचा विचार केला तर पंजाब आणि हरियाणा ही दोन राज्य संपूर्ण भारतात ओळखली जातात. या दोन राज्यात मोठ्या प्रमाणात गव्हाचे उत्पादन घेतले जाते. आपल्या महाराष्ट्रात देखील गहू लागवड विशेष उल्लेखनीय आहे.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की एक नोव्हेंबर पासून वेळेवर गव्हाची पेरणी सुरू केली जाते. एक नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर हा कालावधी वेळेवर गहू पेरणी करण्यासाठी सर्वोत्कृष्ट असल्याचा दावा कृषी तज्ञांनी केला आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांनी 15 नोव्हेंबर पर्यंत वेळेवर पेरणी करावी जेणेकरून त्यांना गव्हाच्या पिकातून अधिक उत्पादन मिळू शकणार आहे.

मित्रांनो शेतकरी बांधवांना वेळेवर गव्हाची पेरणी करायची असेल तर फुले समाधान, त्र्यंबक, गोदावरी या सुधारित जातींच्या गव्हाची पेरणी करावी. या तिन्ही जाती महाराष्ट्रातील हवामानासाठी अनुकूल असून महाराष्ट्रासाठी शिफारशीत करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या जातीपासून शेतकरी बांधवांना चांगले उत्पादन देखील मिळते. तसेच या जाती वेगवेगळ्या रोगांसाठी देखील प्रतिकारक आहेत. मित्रांनो खरं पाहता कोणत्याही पिकातून दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी त्या पिकाच्या सुधारित जातींची पेरणी करणे अतिशय आवश्यक असते जाणकार लोक देखील तसाच सल्ला देतात.

गव्हाच्या पिकाच्या बाबतीत देखील तसेच काहीस आहे गव्हाच्या सुधारित जातींची पेरणी केल्यास शेतकरी बांधवांना गव्हाच्या शेतीतून अधिक कमाई होणार आहे. याव्यतिरिक्त जाणकार लोकांनी शेतकरी बांधवांना गहू पिकासाठी योग्य पद्धतीने खतांचे व्यवस्थापन करण्याचा सल्ला दिला आहे.

मित्रांनो कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांनी दिलेल्या बहुमूल्य माहितीनुसार, गव्हाची पेरणी करतांना 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे, याकरिता 192 किलो 10:26:26 + युरिया 67 किलो किंवा 109 किलो डायअमोनियम फॉस्फेट + युरिया 66 किलो किंवा 313 किलो सिंगल सुपर फॉस्फेट + 84 किलो म्युरेट ऑफ पोटॅश + 109 किलो युरिया प्रति हेक्टरी खताची मात्रा द्यावी.