Krushi News Marathi: मित्रांनो भारतात (India) गेल्या अनेक दशकांपासून मोठ्या प्रमाणात गव्हाची शेती (Wheat Cultivation) केली जात आहे. जगातील एकूण गहू उत्पादनात (Wheat Production) भारताचा मोठा सिंहाचा वाटा आहे.

मात्र असे असले तरी यंदा कडक उन्हामुळे गव्हाच्या उत्पादनात घट झाली असल्याचा दावा केला जातं आहे. या वर्षी कडक उन्हामुळे गहू उत्पादक शेतकऱ्यांचे (Wheat Grower Farmer) मोठे नुकसान झाले आहे.

उत्पादनात घट झाल्याने गव्हाला यावर्षी चांगला बाजारभाव (Wheat Rate) मिळाला आहे. अशा परीस्थितीत आता अशा प्रकारच्या गव्हाच्या वाणाची (Wheat Variety) मागणी केली जाऊ लागली आहे, ज्या गव्हाच्या जातीपासून जास्त उष्णतेमध्येही चांगले उत्पादन मिळू शकेल.

खरं पाहता हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कृषी शास्त्रज्ञ (Agriculture Scientists) देखील दीर्घकाळापासून गव्हाची अशी वाण विकसित करण्यासाठी काम करत आहेत.

यंदा गव्हाच्या अशा वाणाची आवश्यकता अधिक भासली आणि त्यावर अधिक चर्चा देखील झाली आहे. कारण यंदा गव्हाच्या पिकाला उष्णतेचा मोठा फटका बसला आहे.

मात्र आता यावर तोडगा निघाला असून मध्य प्रदेशातील नर्मदापुरम येथील गहू संशोधन केंद्राने गव्हाच्या दोन नवीन जाती शोधल्या आहेत, ज्या उच्च तापमानातही चांगले उत्पादन मिळवून देण्यास सक्षम राहणार आहेत.

गव्हाच्या या नवीन जातींची नावे 1634 आणि 1636 अशी आहेत. त्याचे बियाणे पुढील रब्बी हंगामापासून म्हणजे सप्टेंबर-ऑक्टोबरपासून बाजारात येणार असल्याचे सांगितले जातं आहे.

वास्तविक, गव्हाच्या जुन्या जातीला तापमान वाढीचा मोठा फटका बसत असून जुन्या जाती तापमान वाढलेले असताना कमी उत्पादन देऊ लागल्या आहेत.

यामुळे गहू उत्पादक शेतकऱ्यांना अडचणी येऊ लागल्या आहेत. जुन्या जातीचे गहू फेब्रुवारी आणि मार्चमध्ये जास्त तापमान असल्याने वेळेआधीच पिकत आहेत. त्यामुळे उत्पादनात 20-25 टक्के घट होते.

नवीन वाणांचे संशोधन कोठे झाले?:- नर्मदापुरम, इंदूर, जबलपूर आणि सागर येथे नवीन प्रकारच्या बियाण्यांवर संशोधन करण्यात आले.

त्यात असे दिसून आले की या नवीन जातीचे गहू उच्च तापमानात देखील वेळेपूर्वी पिकत नाही. गव्हाच्या जुन्या वाणांचे सरासरी उत्पादन जे 65 क्विंटल प्रति हेक्टर होते ते फेब्रुवारी-मार्चमध्ये उच्च तापमानामुळे 55 ते 60 क्विंटलवर आले.

परंतु गव्हाच्या नवीन जातीमध्ये 65 क्विंटल इतकेच उत्पादन राहिले. याशिवाय या नवीन जाती तापमान सामान्य असल्यास 70 क्विंटल पर्यंत उत्पादन देण्यास सक्षम असल्याचा दावा देखील केला गेला आहे. यामुळे निश्चितच गहू उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गव्हाची नवीन जात किती दिवसात तयार होते?:- गव्हाची 1634 हे वाण 110 दिवसांत काढणीसाठी तयार होत असल्याचा दावा कृषी शास्त्रज्ञ करत आहेत.

तर गव्हाच्या 1636 ही जातं 115 दिवसांत म्हणजेच 1634 पेक्षा पाच दिवस उशिरा काढणीसाठी तयार होतं आहे. शिवाय जुन्या वाणांपेक्षा नवीन वाण चवीला चांगले असल्याचा दावा देखील केला जात आहे.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, नवीन जातीच्या बियाण्यांचे उत्पादन जुन्यापेक्षा 10 टक्के जास्त असले, तरच ते रिलीज केले जाते.