Wheat Farming : राज्यात सध्या खरीप हंगाम (Kharif Season) सुरू असून परतीच्या पावसामुळे (Rain) खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या (Farmer) हातून गेला आहे. खरीप हंगामात शेतकर्‍यांना अतिशय कवडीमोल उत्पन्न (Farmer Income) मिळणार असल्याचे चित्र आहे.

सुरुवातीला अतिवृष्टी नंतर ढगाळ हवामान आणि आता शेवटी-शेवटी परतीचा पाऊस त्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन समवेत सर्व मुख्य पिकांची राख-रांगोळी झाली आहे. यामुळे शेतकरी बांधवांना (Farmer) हजारो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.

आता खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. अशा परिस्थितीत खरीप हंगामातील झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी शेतकरी बांधव रब्बी हंगामाकडे (Rabi Season) मोठी आशा लावून वळणार आहे. मित्रांनो रब्बी हंगामात संपूर्ण भारत वर्षात गव्हाची (Wheat Crop) मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. आपल्या राज्यात देखील गहू लागवड विशेष उल्लेखनीय आहे.

जाणकार लोकांच्या मते रब्बी हंगामातील हे मुख्य पीक शेतकऱ्यांना निश्‍चितच चांगले उत्पन्न मिळवून देऊ शकते. मात्र या पिकातून विक्रमी उत्पादन मिळविण्यासाठी शेतकरी बांधवांना या पिकाच्या सुधारित जातींची (Wheat Variety) पेरणी करण्याचा सल्ला दिला जातो.

अशा परिस्थितीत आज आपण आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी मित्रांसाठी गव्हाच्या एका सुधारित जातीची माहिती घेऊन हजर झालो आहोत. आज आपण अवघ्या शंभर दिवसात उत्पादन देण्यासाठी तयार होणाऱ्या गव्हाच्या DBW 93 या जाती विषयी थोडक्यात पण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या जाती विषयी सविस्तर.

DBW 93 जातीची विशेषता खालील प्रमाणे :-

मित्रांनो गव्हाची ही जात अधिक उत्पादनासाठी विशेष ओळखली जाते. या जातीची आपल्या महाराष्ट्रा साठी शिफारस करण्यात आली आहे. महाराष्ट्रव्यतिरिक्त या जातीची कर्नाटक राज्यात लागवडीसाठी शिफारस केली जाते. या जातीची वेळेवर पेरणी करण्यासाठी शिफारस करण्यात आली असून मर्यादित सिंचन परिस्थितीत देखील ही जात उत्पादन देण्यासाठी ओळखली जाते. या जातीच्या गहू पिकातून हेक्टरी 29.30 क्विंटल उत्पादन मिळू शकते.

मात्र असे असले तरी 39 क्विंटल प्रति हेक्‍टर संभाव्य उत्पादन या जातीपासून मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या जातीच्या गहू पिकाची उंची 54-68 सेमी पर्यंत असते. जगातील सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही जात 100 ते 110 दिवसांत उत्पादन देण्यासाठी तयार होत असते.

याशिवाय ही जात काळा तांबेरा रोगासाठी देखील प्रतिकार करण्याचा दावा करण्यात आला आहे. निश्चितच तांबेरा रोगासाठी प्रतिकारक असल्याने या जातीच्या उत्पादनासाठी उत्पादन खर्च नगण्य लागणार आहे. यामुळे उत्पादनात आणि उत्पन्नात भरीव वाढ होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.