अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :- गॅस ग्राहकांना घरपोहोच दिल्या जाणार्‍या गॅस टाक्यांमधून गॅस चोरी करून व्यावसायिक वापरासाठीच्या गॅस टाक्या भरत असलेल्या ठिकाणी तोफखाना पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. या छाप्यामध्ये 43 गॅस टाक्या पकडण्यात आल्या आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी आरोपी भगवानराम गिरधरीराम बिष्णोई, (वय 23 जोधपुर राजस्थान), भजनलाल जगदीश बिष्णोई(रा.राजस्थान), तसेच एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, सावेडी उपनगरातील सिव्हिल हडको परिसरात एका बंद खोलीत ग्राहकांना घरपोच दिल्या जाणार्‍या गॅस सिलेंडरमधून गॅस चोरी करून व्यावसायिक वापराच्या टाकीत भरला जात होता.

यावेळी तोफखाना गुन्हे प्रकटीकरण पथकाने छापा टाकला. यावेळी कराचीवाला गॅस एजन्सीच्या नावे असलेल्या रिक्षा टेम्पो, 43 घरगुती व व्यावसायिक सिलेंडर्स आढळून आले.

यासंदर्भात तोफखाना पोलिसांनी तीन जणांना अटक असून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अशी होत होती गॅसची चोरी दरम्यान पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी गुन्ह्याची माहिती दिली. नागरिकांना दिल्या जाणाऱ्या घरगुती सिलेंडरमधून दोन ते अडीच किलो गॅस चोरी करून व्यावसायिक वापराच्या टाक्या भरल्या जात होत्या.

त्यामुळे नागरिकांना कमी गॅस मिळत होता. पोलिसांच्या कारवाई त हा काळा बाजार उघडकीस आला आहे. नागरिकानी गॅस घेताना टाक्या तपासून घ्याव्यात, असे आवाहन ही गडकरी यांनी केले आहे.