file photo

अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- जिवंत माणूस पाण्यात पडला तर तो पाण्यात बुडतो परंतु मृत शरीर पाण्यात बुडत नाही तर वर तरंगते. कदाचित तुम्हालाही कल्पना तुम्हाला असेल. परंतु आपण कधीही विचार केला आहे की असे का घडते? की सजीव शरीर पाण्यात बुडते परंतु मृत शरीर बुडण्याऐवजी तरंगते.

काय आहे यामागील खर कारण चला समजुन घेउयात. खरं तर, कोणतीही वस्तू ज्याची घनता पाण्यापेक्षा जास्त आहे, पाण्यात सहज बुडते. हेच कारण आहे की एक सजीव शरीर पाण्यात बुडते कारण जिवंत शरीराची घनता जास्त असते ज्यामुळे आपले शरीर पाण्यात बुडते.

मृत्यूनंतर शरीरात काय प्रक्रिया होते? जेव्हा एखादी व्यक्ती मरण पावते तेव्हा तिच्या शरीरात गॅस तयार झाल्यामुळे तिचं शरीर फुगू लागते. फुगल्यामुळे शरीराचं आकारमान वाढतं आणि शरीराची घनता कमी होते. त्यामुळे मृत शरीर पाण्यावर तरंगतं.

मृत शरीर कुजू लागते : माणूस मेल्यानंतर त्याच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कार्य करणे थांबवते. शरीर विघटित होऊ लागते. मृत शरीरातील जीवाणू पेशी आणि ऊती नष्ट करण्यास सुरवात करतात. जीवाणूंमुळे शरीरात मिथेन, अमोनिया, कार्बन डाय ऑक्साईड, हायड्रोजन इत्यादी वेगवेगळे वायू तयार होऊ लागतात आणि शरीराच्या बाहेर पडू लागतात. त्यामुळं शरीर तरंगू लागतं.

सोप्या शब्दात – शेवटी, सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे , मृत शरीराच्या उच्च घनतेमुळे प्रथम ते पाण्यात बुडते, परंतु जसे शरीर सडते तसे घनता कमी होऊ लागते आणि त्यामुळे हलके होते तसेच त्यात अनेक प्रकारचे वायू देखील होतात. ज्यामुळे ते तरंगू लागते. सजीव शरीर बुडत असताना मृत शरीर पाण्याच्या पृष्ठभागावर का तरंगते? याचे उत्तर तुम्हाला भेटले असेल अशी अपेक्षा करतो.