file photo

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- राज्यात कोरोनाची असलेली दुसरी लाट आता ओसरत असल्याचं दिसत आहे. अनेक जिल्ह्यांत कोरोना रुग्णसंख्या ही जळवपास आटोक्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यातील निर्बंध हटवण्याची मागणी समोर येऊ लागली आहे. राज्यातील निर्बंध शिथिल करण्यात येतील का?

या संदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याचे आरोग्य विभाग आणि टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेत आहेत. या बैठकीनंतर मुख्यमंत्री हे निर्बंध शिथिल करण्याच्या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. करोना रुग्णांची संख्या अधिक असलेले जिल्हे वगळता इतर अनेक जिल्ह्य़ांत करोना रुग्णसंख्या कमी आहे.

त्यामुळे हे १०-११ जिल्हे वगळता इतर ठिकाणी निर्बंध शिथिल करण्याचा विचार के ला पाहिजे. शाळा-महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी देण्याबाबतही पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली. मुंबईतील उपनगरी रेल्वेसेवा आणखी काही लोकांसाठी सुरू करण्याचाही विचार झाला पाहिजे.

लसीच्या दोन मात्रा घेतलेल्यांना सवलत मिळाली पाहिजे, असा मु्द्दा मांडण्यात आला. लोकल ट्रेन संदर्भात काय निर्णय? मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल ट्रेन सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून आणि प्रवासी संघटनांकडून सुरू आहे.

मुंबई आणि आसपासच्या शहरांतील रुग्णसंख्याही आटोक्यात असल्याचं दिसत आहे. त्यामुळे लोकल ट्रेन संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार या कडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. निर्बंध शिथिल करण्याबाबत मुख्यमंत्री ठाकरे हे आरोग्यविषयक कृती गटातील तज्ज्ञ डॉक्टरांशी गुरुवारी चर्चा करणार असून त्यानंतर या सर्व गोष्टींवर निर्णय घेण्यात येईल, असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

रेल्वे गाडय़ांमध्ये सामान्यांना प्रवासास परवानगी देण्याची मागणी होत असली तरी तशी परवानगी लगेचच मिळण्याची शक्यता कमी असल्याचे संकेत देण्यात आले.