file photo

अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या विकास निधीतून चिलेखनवाडी, अंतरवाली, तरवडी व जेऊर हैबती येथे विविध विकास कामांचा शुभारंभ माजी सभापती सुनीता गडाख यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला.

विकास कामांच्या माध्यमातून परिसराचा कायापालट करणार असल्याची ग्वाही यावेळी माजी सभापती गडाख यांनी दिली. चिलेखन वाडीतील गावठाण ते सावंत वस्ती पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी, अंतरवलीतील बंदिस्त गटारचे काम, सरोदे गल्ली येथे पेव्हिंग ब्लॉक बसवणे,

देशमुख वस्ती शाळा वॉल कंपाउंड, गावठाण रस्ता काँक्रीटीकरण करणे, तरवडीतील सावता मंदिर येथे (पाकशाळा) शेडचे काम आदी विकासकामांचे सुनीता गडाख यांच्या हस्ते उद्घाटन करुन प्रारंभ करण्यात आला.

अंतरवली येथे राजनंदिनी मंडलिक व अजित मंडलिक, सरपंच संदीप देशमुख, उपसरपंच रवींद्र ओहोळ, सेवा संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब सटाले, प्रा. भारत वाबळे, प्रवीण वाबळे, सुनील वाबळे, सुनील ओहोळ, संदीप वाबळे, लोखंड, अंकुश वाबळे, देविचंद वाबळे आदी उपस्थित हाेते.