प्रलंबित मागण्यांसाठी झेडपी परिचर कर्मचारी संघटनेचे आंदोलन

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :- प्रलंबित प्रश्नांची शासन दरबारी सोडवणूक होत नसल्याने चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनात नगर जिल्हा परिषद परिचर कर्मचारी संघटनेनी सक्रिय सहभाग नोंदवला.

शुक्रवारी परिचर संवर्गातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करून जिल्हा परिषदेच्या आवारात निदर्शने केली. जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आंदोलक कर्मचाऱ्यांची भेट घेवून त्यांच्या मागण्यांची माहिती घेतली.

शासनाने वर्ग ४ ची पदे निरसित करू नये, चतुर्थश्रेणीची २५ टक्के पदे निरसित करण्याचा १४ जानेवारी २०१६ चा शासन निर्णय तात्काळ रद्द करण्यात यायवा, चतुर्थश्रेणी सेवांचे व कर्मचाऱ्यांचे खासगीकरण, कंत्राटीकरण करु नये,

अनुकंपा तत्वावरील भरती विनाअट तात्काळ करावी, वेतनत्रुटीसंदर्भातील खंड २ च्या अहवालाची अंमलबजावणी करावी, सातव्या वेतन आयोगानुसार केंद्राप्रमाणे सर्व भत्ते मिळावेत

तसेच महागाई भत्त्याची थकबाकी त्वरित मिळावी, सन २००५ नंतर शासन सेवेत रूजू झालेल्या कर्मचाऱ्यांना लागू केलेली अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी आदी मागण्याकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!