file photo

अहमदनगर Live24 टीम, 23 जुलै 2021 :- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या काही दिवस थांबविण्यात आल्या होत्या. मात्र आता जिल्हा परिषेदेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून या बदल्या सुरू आहे.

करोना संसर्गामुळे जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या यंदा समुपदेशनाने ऑनलाईन बदल्या करण्यात येत आहेत. मंगळवारी पहिल्या दिवशी 49 कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात तर काल गुरूवारी दोन विभागातील 11 कर्मचार्‍यांच्या बदलीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

पहिल्या दिवशी सामान्य प्रशासन, अर्थ आणि कृषी विभागातील कर्मचार्‍यांच्या बदल्या झाल्यानंतर काल लघू पाटबंधारे विभागातील प्रशासकीय एक बदली, ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील एक प्रशासकीय बदली आणि पशू संवर्धन विभागातील पशूधन पर्यवेक्षक यांची एक प्रशासाकीय,

सहा विनंती आणि 2 आपसी अशा 9 बदल्या करण्यात आल्या. यामुळे जिल्हा परिषदेच्या सहा विभागातील अवघ्या 60 कर्मचार्‍यांच्या बदल्या झाल्या असून अलिकडच्या वर्षातील हे प्रमाण सर्वात कमी असण्याची शक्यता आहे.

दरम्यान यंदाच्या बदली प्रक्रियेत प्रशासकीय बदल्याचे प्रमाण कमी असल्याने विनंती आणि आपसी बदल्या करून प्रशासन कर्मचार्‍यांची सोय करत आहे.