प्रचार दौऱ्यावर असलेल्या आमदार रोहित पवारांचा दौरा अचानक रद्द

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी राष्ट्रादीचे युवा नेते व कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत.

मात्र, आज दुपारपासून त्यांनी अचानक दौरा रद्द केला आहे. दरम्यान पदवीधर निवडणुकीच्या प्रचाराने सध्या वातावरण तापले आहे. भाजप विरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना (महाविकास आघाडी) अशी लढत होत आहे.

प्रत्येक मतदारसंघात आपला उमेदवार विजयी व्हावा म्हणून प्रचारसभांचा तडाखा सध्या सुरु आहे. पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी आमदार रोहित पवार गुरुवार व शुक्रवारी सोलापूर जिल्ह्यात दौऱ्यावर होते.

शुक्रवारी त्यांनी मोहोळ येथील बैठक संपल्यानंतर दौरा रद्द केला आहे. ट्विट करुन त्यांनी ही माहिती दिली आहे. सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांना आज रुग्णालयात दाखल केल्याने त्यांनी हा दौरा रद्द केला असल्याची चर्चा आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment