Soybean Bajarbhav : सोयाबीन उत्पादन शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन, सोयाबीन तेल आणि सोयापेंड तिन्हीच्या किमती कमालीच्या वाढत आहेत. शिवाय केंद्र शासनाने एक शेतकरी हिताचा निर्णय घेतला आहे. केंद्र शासनाने सोयाबीन आणि सोयाबीन तेलावरील साठ्याचे निर्बंध शिथिल केले आहेत. म्हणजेच केंद्र शासनाने सोयाबीन आणि सोयाबीन तेलावर असलेली स्टॉक लिमिट काढून घेतली आहे.
त्यामुळे देशांतर्गत सोयाबीन बाजारभावात वाढ होत आहे. मित्रांनो काल राज्यातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात 100 ते 200 रुपयांपर्यंत वाढ झाली. काल हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला 5590 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. विशेष म्हणजे या बाजारात सर्वसाधारण बाजार भाव 5122 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
तसेच काल राज्यातील सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला सरासरी 4700 रुपये प्रति क्विंटल ते पाच हजार तीनशे रुपये प्रतिक्विंटल पर्यंत बाजारभाव मिळाला आहे. निश्चितच सध्या मिळत असलेला बाजार भाव सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांच्या अपेक्षेप्रमाणे नसला तरी देखील भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात वाढ होण्याची शक्यता जाणकार लोकांकडून वर्तवली जात आहे. जाणकार लोकांच्या मध्ये केंद्र शासनाने सोयाबीनवरील स्टॉक लिमिट काढून घेतली असल्याने याचा बाजारावर सकारात्मक परिणाम पाहायला मिळणार आहे.
दरम्यान स्टॉक लिमिट काढून घेतल्यानंतरही बाजार भाव मात्र 100 ते 200 रुपये प्रति क्विंटल पर्यंत वाढले असल्याने भविष्यात बाजार भाव किती वाढतात याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. जाणकार लोकांच्या मते केंद्र शासनाने स्टॉक लिमिट काढली असली तरी देखील भारतीय सोयापेंडला आंतरराष्ट्रीय बाजारात अपेक्षित असा उठाव नसल्याने आणि वायदे बंदीमुळे सोयाबीन बाजार भाव काहीसे नरमलेले पाहायला मिळत आहेत.
दरम्यान, जाणकार लोकांच्या मते सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांनी पाच हजार रुपये ते 6000 रुपये प्रति क्विंटल एवढी सोयाबीनची दर पातळी लक्षात घेऊन सोयाबीनची विक्री केल्यास त्यांच्यासाठी फायद्याचे राहणार आहे. सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांच्या मते, यावर्षी सोयाबीन उत्पादित करण्यासाठी त्यांना अधिक उत्पादन खर्च करावा लागला आहे.
यामुळे सध्या मिळत असलेल्या बाजारभावात त्यांना उत्पादन खर्च काढणे देखील अशक्य आहे. शिवाय यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना मोठा फटका बसला असून उत्पादनात घट होण्याची दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीत सध्या मिळत असलेला बाजार भाव सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी फायदेशीर ठरणार नसल्याचे चित्र आहे.