निसर्गविरोधी
प्लास्टरच्या मूर्ती : प्लास्टरच्या मूर्ती वजनाला हलक्या आणि लवकर सुकणार्या असतात. उत्पादन आणि वाहतुकीच्या दृष्टीने सोयीच्या; पण विसर्जनानंतर त्या पाण्यात विरघळत नाहीत.
विषारी रंग : मूर्तीचे रासायनिक रंग अत्यंत विषारी असतात.
मूर्तिचा आकार : मोठ्या आकाराच्या मूर्तीमुळे मातीचा आणि प्लॅस्टरचा वापर वाढतोे. या मूर्तीच्या विसर्जनानंतर
नद्या, विहिरी, तळी यांमध्ये गाळ वाढतो.
आरास : प्लास्टिक, थर्माकोल अशा अ-विघटनक्षम पदार्थांचा वापर केला जातो. रोषणाईसाठी वीज जाळली जाते.
निर्माल्य : पाण्यात टाकले गेल्याने पाणी दूषित होते.
ध्वनिप्रदूषण : सार्वजनिक आणि घरगुती उत्सवात ध्वनिवर्धकांचा अतिरेकी वापर होतो.
आरोग्य आणि निसर्गाची अशी हानी हिंदू धर्माला मान्य नाही.
निसर्गस्नेही गणेशोत्सव असा साजरा करा!
- मूर्ती मातीचीच असावी. ती शक्यतो स्वत: बनवा. मूर्तीसाठी घराच्या आजूबाजूच्या मातीचा वापर करा.
- ती छोटी असावी. मूर्तीचा आकार आणि भक्ती यांचा काहीही संबंध नाही.
- मातीचे व जलरंग वापरून ती रंगवा किंवा शेंदूर वापरा.
- हे शक्य नसेल, तर नेहमीच्या पूजेतील धातूची गणेशमूर्ती वा एखादी फोटोफ्रेम ‘उत्सवमूर्ती’ म्हणून बसवा.
- आरास करण्यासाठी रंगीत पाने, फुले, फळे इत्यादींचा वापर करा. प्लास्टिक, थर्माकोल किंवा अगदी कागदाचाही वापर टाळा.
- मूर्तीपाशी तेलाचा दिवा लावा. विजेची रोषणाई टाळा.
- मूर्तीचे विसर्जन घरीच बादलीत करा.
- निर्माल्याचे विसर्जन कुंडीत किंवा झाडांच्या बुंध्याशी करा. त्याचे खत बनेल.
- ध्वनिवर्धकांचा वापर टाळा.
काळाच्या ओघात धर्मात शिरलेल्या विकृती दूर करून हिंदू धर्म पुनश्च निसर्गस्नेही बनवू या.