कौतुक कराव तेवढं कमी ! अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ तरुणांनी उभारलं जनावरांसाठी देशातील पहिलं क्वारंटाईन सेंटर ; लंपी आजाराने बाधित जनावरांवर होत आहेत मोफत उपचार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Breaking : मित्रांनो संपूर्ण भारत वर्षात पशुधनावर एक मोठं संकट आलं आहे. लंपी या त्वचेच्या आजाराने जनावरांवर मोठ संकट आल आहे. या आजारामुळे देशातील पशुधन मोठ्या प्रमाणात दगावत असल्याचे चित्र आहे.

आपल्या महाराष्ट्रात देखील लंपी आजाराचा शिरकाव झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातहीं लंपी आजाराचा हाहाकार पाहायला मिळत आहे. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील दोन तरुणांनी पशुधनावर आलेल्या या संकटाच्या काळात अतिशय कौतुकाचं काम हाती घेतल आहे.

मित्रांनो ज्या पद्धतीने कोरोना या संसर्गजन्य आजारापासून संरक्षण करण्यासाठी क्वारंटाईन सेंटर हा एक चांगला पर्याय सिद्ध होत होता. त्याच पद्धतीने जनावरांमधला लंपी हा देखील एक संसर्गजन्य आजार आहे. अशा परिस्थितीत या आजाराने बाधित झालेल्या जनावरांना देखील अलिप्त ठेवणे आवश्यक असते. त्यासाठी देखील क्वारंटाईन सेंटर उभारणे आवश्यक आहे.

अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्याच्या तिसगाव येथे दोन नवयुवक तरुणांनी जनावरांसाठी क्वारंटाईन सेंटर सुरू केले आहे. या क्वारंटाईन सेंटर बाबत दावा करण्यात आला आहे की जनावरांसाठी सुरू करण्यात आलेले हे क्वारंटाईन सेंटर देशातील पहिले सेंटर आहे. मित्रांनो तिसगावातील शरद मरकडं व विपुल वाखूरे या दोन नवयुकांनी हे सेंटर सुरू केले आहे. निश्चितच या दोन्ही नवयुवकांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.

मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यात या आजाराने बाधित जनावरांची संख्या वीस हजाराच्या पुढे गेली आहे. अशा परिस्थितीत यावर वेळीच नियंत्रण मिळवणे अतिआवश्यक आहे. यासाठी शासन दरबारी देखील उपाय योजना आखल्या जात आहेत. दरम्यान या दोन तरुणांनी देखील या आजारावर मात करण्यासाठी क्वारंटाईन सेंटर सुरु केले आहे.

मित्रांनो यामुळे आजूबाजूच्या परिसरातील पशुपालक शेतकऱ्यांना दिलासा मिळत असून बाधित जनावरांना उपचारासाठी या सेंटरमध्ये भरती केले जात आहे. मित्रांनो हाती आलेल्या माहितीनुसार या सेंटरमध्ये 100 जनावरे हल्ली ठेवण्यात आली असून या जनावरांवर उपचार सुरू आहेत.

मित्रांनो सेंटरमध्ये पशुवैद्यकीय जनावरांवर आवश्यक ते उपचार करत आहेत. याव्यतिरिक्त देखील येथे कार्यरत असलेले स्वयंसेवक जनावरांच्या प्लेटलेट वाढवण्यासाठी पपई पाल्याचा ज्यूस पाजणे, गुळाचे पाणी पाजणे, वाफ देणे, गरम ऊब देणे यांसारखे काम करत आहेत. विशेष म्हणजे या क्वारंटाईन सेंटर मध्ये आयसीयु वार्ड, जनरल वार्ड यांसारखे कक्ष बनवले गेले आहेत. आतापर्यंत या सेंटरमध्ये 90 गुण अधिक जनावरांना यशस्वीरीत्या बरे करण्यात आले आहे. दरम्यान सध्या या सेंटरमध्ये 100 जनावर लंपी आजारावर उपचार घेत आहेत.

या जनावरांसाठी दिवसाकाठी 10 ते 12 हजार रुपयांचा खर्च होत आहे. तसेच, या ठिकाणी बारा लोकांचा स्टाफ देखील कामाला आहे. मित्रांनो क्वारंटाईन सेंटरमध्ये जनावरांची ने-आण करण्यासाठी एक ॲम्बुलन्स असून अजून दोन ॲम्बुलन्सची आवश्यकता असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे या सेंटरमध्ये जनावरांवर मोफत उपचार केले जात आहेत.

एवढेच नाहीतर बाधित जनावर आहे सेंटरमध्ये आणणे आणि आजारापासून बरे झालेले जनावरे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हे सर्व काम सेंटरच्या माध्यमातून स्वयंसेवक करत आहेत. मित्रांनो हे सेंटर सामाजिक कार्यकर्ते शरद मरकड यांचे बळीराजा फाउंडेशन तसेच विपुल वाखूरे यांचे विनायक राज फाउंडेशन यांच्या माध्यमातून चालवले जात असून हे सर्वस्वी स्वखर्चाने चालवत आहेत. यासाठी शासकीय मदत मिळालेली नाही. निश्चितच नगरच्या भूमिपुत्रांनी सुरू केलेली