नदी पात्रात सुरू होता वाळू उपसा; पोलीस जाताच झाले असे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :-  अवैधरित्या वाळूचा उपसा करून वाहतूक करणाऱ्या एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले. कारवाई दरम्यान एक जण पसार झाला.

अजय राजेंद्र घोरतळे (वय २२ रा. बोधेगाव ता. शेवगाव) असे पकडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर महेश राजेंद्र घोरतळे (रा. बोधेगाव) हा पसार झाला आहे.

शेवगाव तालुक्यातील काशी नदीपात्रात ही कारवाई केली. आरोपी विरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३७९, ३४ सह पर्यावरण कायदा कलम ३, १५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस अंमलदार शिवाजी ढाकणे यांनी फिर्याद दिली आहे. ट्रॅक्टर- ट्रॉली व वाळू, असा पाच लाख १० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

काही इसम काशी नदीपात्रात वाळू उपसा करून वाहतूक करत आहेत, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती.

त्यांनी पोलीस अंमलदार ढाकणे, शंकर चौधरी, राहूल सोळंके, रणजीत जाधव, शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार भगवान बडधे, वासुदेव डमाळे यांच्या पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले.

पथक काशी नदीपात्रात गेले असता तेथे काही इसम ट्रॅक्टर- ट्रॉलीमध्ये मजूराच्या साहाय्याने वाळू उपसा करताना दिसले.

ट्रॅक्टरवरील चालक अजय घोरतळे याला ताब्यात घेतले. ट्रॅक्टर- ट्रॉलीचा मालक महेश घोरतळे पसार झाला आहे. पुढील तपास शेवगाव पोलीस करत आहे.