शेतकऱ्यांसाठी ब्रेकिंग बातमी : ‘हे’ पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शेतकरी अपघात विमा योजनेचे प्रक्रिया काही दिवसापासून खंडित होती. तर विम्याचे पैसे खात्यावर जमा होण्यासाठी शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई दावे दाखल केले होते.

पण मात्र त्याची दखल घेतली जात नव्हती. पण कृषी आयुक्तालयाने खंडित कालावधीत मंजूर करण्यात आलेल्या शिफारशी राज्य सरकारकडे पाठविल्याने याला मंजूरी मिळाली असून विम्याच्या रकमा बॅक खात्यामध्ये त्वरीत जमा करण्याच्या सूचना कृषी आयुक्तालयाने दिल्या आहेत.

ही योजना 1 डिसेंबर 2016 पासून स्व. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना ही म्हणून राबवली जात आहे. शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आले तर मदत रक्कम ही दिली जाते. पण डिसेंबर 2020 ते 7 एप्रिल या दरम्यानच्या कालावधीत योजनेचा करार संपल्याने ही योजना बंद होती.

आता मात्र राज्य सरकारकडून मिळालेल्या मंजुरी नंतर ही योजना पुन्हा सुरू करण्यात आली आसून खंडित कालावधी दरम्यान, 1 हजार 168 शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू तर 17 शेतकऱ्यांना अपंगत्व आल्याचे दावे कृषी विभागाकडे दाखल झाले होते.

अपघातामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर 2 लाख आणि अपंगत्व आले तर 1 लाख असे त्याचे स्वरुप आहे. त्यानुसार आता 23 कोटी 36 लाख अपघाती मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मिळणार आहेत. तर अपघातामुळे ज्यांना अपगंत्व आले आहे.अशा शेतकऱ्यांना 17 लाख रुपये मिळणार आहेत.

अपघात विम्यासाठी कृषी विभाग विमा कंपनी कडे कागदांची पूर्तता करतात. संबंधित शेतकऱ्यास किंवा शेतकरी कुटुंबास विमा रक्कम ही अदा करण्यासाठी.

त्या शेतकऱ्यांनी अपघात झाल्यास पोलीस पंचनामा, पोस्टमार्टम रिपोर्ट, सातबारा,मृत्यृ प्रमाणपत्र, आठ ‘अ’, 6 क, 6 ड,अपघात झालेल्या शेतकऱ्याच्या वारसाचे प्रमाणपत्र, वारसा अर्जदार इत्यादी कागदपत्रे जमा करणे गरजेचे आहे.