गळीतास आलेल्या ऊस आगीत जळून खाक ! तालुक्यात एकच खळबळ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : कोपरगाव तालुक्यातील चासनळी शिवारात गळीतास असलेल्या ऊसाला अज्ञात इसमाने लावलेल्या आगीत ४५ हजारांचे नुकसान झाले. या घटनेमुळे चासनळीसह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत शेतकरी प्रकाश भाऊसाहेब गाडे यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील चासनळी शेतकरी प्रकाश गाडे यांच्या गट क्रमांक २६/२ मधील गळीतास आलेला ऊसाला काल मंगळवारी (दि. १३) दुपारी दीड वाजेच्या सुमारास आग लागल्याची खबर त्यांचे पुतणे निखिल गाडे यांनी फोनवरून दिली होती.

त्यावेळी त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसंगावधान राखून आपला जवळच असलेला एक एकर गहू वाचविण्यासाठी कर्मवीर काळे सहकारी साखर कारखान्यास फोन करून अग्निशामक गाडी बोलावून घेतली होती.

त्यात त्यांनी गहू वाचविला असला, तरी या आगीत त्यांचा सुमारे ४५ हजारांचा ऊस, त्यातील ठिबक सिंचनासह जळून खाक झाला आहे. त्यांनी घटनेपूर्वी अवघे पाच मिनिटे आपल्या ऊसाची पाहणी केली होती. ते आपल्या घरी जात नाही, तोच त्यांना दूरध्वनी आला होता.

त्यामुळे या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्यासह पो.हे.कॉ. संदीप बोटे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. याबाबत पोलीस निरीक्षक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. बोटे पुढील तपास करीत आहेत.