अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:-दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनातील देशव्यापी शेतकरी संघटनांनी देशामध्ये चक्काजाम आंदोलन घोषित केले आहे.
या आंदोलनामध्ये सामील होऊन पाठिंबा देण्यासाठी राहुरी तालुक्यातील सामाजिक संघटना व सर्वपक्षीय राजकीय पक्षांच्या वतीने शनिवार दि. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता मार्केट यार्डसमोर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनामध्ये राहुरी तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवींद्र मोरे, अनिल इंगळे, आनंद वने, शेतकरी संघटनेचे अमोल मोढे,
वंचीत बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अनिल जाधव, जिल्हा प्रवक्ते डॉ. जालिंदर घिगे, अरुण डोंगरे, महिला आघाडीच्या अध्यक्ष वर्षा बाचकर, राहुरी शहर अध्यक्ष पिंटु साळवे,
भारत मुक्ती मोर्चाचे संजय संसारे, संविधान बचाव संघर्ष समितीचे कांतीलाल जगधने यांच्यासह अनेक संघटनेचे व पक्षाचे कार्यकर्ते या देशव्यापी चक्काजाम आंदोलनामध्ये सामील होणार आहे.
केंद्र शासनाच्या धोरणाचा देशातील व राज्यातील सर्व संघटना व पक्ष तीव्र शब्दात जाहीर निषेध करत आहेत. आंदोलन यशस्वी करण्यासाठी संपूर्ण देशामध्ये शनिवारी (दि. ६) दुपारी १२ वाजता चक्काजाम आंदोलन करून या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत, अशा आशयाचे निवेदन सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या वतीने नायब तहसीलदार गणेश तळेकर यांना देण्यात आले.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved