सरपंचांच्या घरावर हल्ला करणाऱ्या चौघांवर गुन्हा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी ग्रामपंचायत येथील आमदार आशुतोष काळे गटाच्या सरपंच मीनल चंद्रशेखर गवळी यांच्या घरावर मध्यरात्री हल्ला करणाऱ्या, प्रताप वाकचौरे,

कृष्णा महाले, बिपिन निंबाळकर व बाला लुटे (सर्व राहणार कोळगाव थडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती कोपरगाव तालुका ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी दिली.

भारत निवडणूक आयोगाने लोकसभेची आदर्श आचारसंहिता लागू जाहीर केली असून कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वात मोठी यात्रा म्हणून मोठेबाबा (मच्छिद्रनाथ) यात्रौत्सव असतो.

येथील नागरिक जातीय सलोखा ठेवून नागरिक एकत्र येऊन मोठेबाबा यात्रा उत्सव साजरा करत असतात. या मोठेबाबा यात्रा उत्सव कमिटीचे अध्यक्ष नंदकिशोर निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली चालू होती.

यातील कमिटीचे खजिनदार सरपंच पती चंद्रशेखर गवळी होते. वरील गुन्हेगारांनी गवळी यांना फोन करून विचारणा केली आम्हाला मोठे बाबा यात्रा उत्सवामध्ये नाचण्यासाठी पारंपरिक वाद्य संबळ (बँजो) का सांगितले नाही तसेच तुम्ही मोठेबाबा मंदिराची स्वच्छता का चांगली केली नाही,

असे उलट सुलट प्रश्न करून बाचाबाची केली व नंतर थेट मध्यरात्रीला सरपंचांच्या घरी येवून राडा केला. गवळी यांना धक्काबुक्की करत असताना मीनल गवळी बाहेर गेल्या व समज देण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यातील एकाने त्यांच्यावर चप्पल भिरकावून मारण्याचा प्रयत्न केला व अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

हे सर्व चालू असताना काही मुलांनी व्हीडीओ चित्रकरण सुरू केल्याने आरोपींनी पळ काढला. मिनल गवळी तक्रारीत म्हटले आहे. वरील आरोपींवर भारतीय दंड संहिता कलम गुन्हा रजिस्यर क्रमांक १६०/०२४ नुसार भा.दं.वि. कलम ५०४ व ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार गजानन वांढेकर करीत आहेत.