बनावट कागदपत्रे तयार करून जमिनी विकणारी सोनेरी टोळी सक्रीय

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :-  बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षकाच्या प्लॉटची कामरगाव व सुपे येथील दोघांना परस्पर विक्री करून सुमारे २२ लाखांना एका टोळीने फसविले आहे. मूळ मालकासह घेणारे दोघे असे तिघेही हवालदिल झाले आहेत.

या बाबत गुन्हा दाखल होताच फसविणारी टोळी फरार झाली आहे. तालुक्यात अशा प्रकारे बनावट कागदपत्रे तयार करून जमिनी विकणारी टोळी सक्रीय आहे. सुपे येथे सेवानिवृत्त शिक्षकाचा अडीच गुठे प्लॉट असून, तो बाहेरगावी राहातो. या सोनेरी टोळीला ही खबर लागताच टोळीने मध्यास्थांमार्फत त्या प्लॉटला ग्राहक शोधण्यास सुरूवात केली.

प्लॉटच्या साताबारा उताऱ्यावर जे नांव आहे त्या नावाप्रमाणे बनावट आधारकार्ड तयार करून घेतले. बाजारभावापेक्षा कमी किंमतीत प्लॉट विकण्यासाठी प्लॉट मालकाची आई खूप आजारी असून, ती पुण्यात दवाखान्यात आहे. असा बनाव केला. संबंधीत टोळीने बनावट मालक दाखवून प्लॉट खरेदी करून दिला.

खरेदी होऊन घेणाऱ्यांच्या नावे पक्की नोंदही झाली. नंतर मात्र खरेदीच्या वेळी दिलेले धनादेश न वटल्याने खरेदीदारांना शंका आली. त्यांनी मालक व मध्यस्थांना फोन लावण्याचा प्रयत्न केला त्यांचे फोन बंद होते. मग चौकशीला सुरूवात केली दुय्यम निबंधक कार्यालयातून मूळ मालकाचे खरेदी खत काढले,

त्यावर मालकाचा फोटो व सही सुद्धा वेगळीच आढळून आल्याने घेणाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी मूळ मालकाचा शोध घेतला त्या वेळी ही माहीती समजताच मूळ मालकही हबकून गेले. आम्ही तुमचा प्लॉट परत देतो असे घेणाऱ्यांनी सांगीतले मात्र मी विकलाच नाही तर मागे कसा घेणार असा विरोध केला.

आम्हाला फसविले आहे असे सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र मालकाचा विश्वास बसला नाही. फसलेल्या दोघांनी तातडीने पोलीस ठाणे गाठले व फिर्याद दिली असून गुन्हा दाखल झाला आहे अता पोलीस त्या सोनेरी टोळीचा शोध घेत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment