Pathardi News : सोन्याच्या दागिन्यांची पॉलिश करून दाखवतो असे म्हणत गावात आले आणि केलं असं कृत्य

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pathardi News : आमच्याकडे सोन्याचे दागिने पॉलिश करण्यासाठी लागणारी पावडर आहे, तिची सँपल आम्ही तुम्हाला देतो व सोन्याच्या दागिन्यांची पॉलिश करून दाखवतो असे म्हणत एका महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने लंपास करण्याच्या प्रयत्नात असलेल्या गोविंद शिवण साह (वय ३८, रा. बिहार) या ठगाला पकडले असून एक आरोपी येथून पसार झाला आहे.

पाथर्डी शहरातील संत वामनभाऊनगर येथील नामदेव बाजीराव खेडकर (वय ६९) यांच्या घरासमोर दोन अनोळखी इसम आले. ते बाजीराव खेडकर यांना म्हणाले की, आम्ही मुंबईच्या कंपनीच्या पावडरची मार्केटींग करण्यासाठी आलो आहोत, आमच्याकडे सोन्याची पॉलिश करण्यासाठी लागणारी पावडर आहे. तिची सँपल आम्ही तुम्हाला देतो व सोन्याचे दागिने पॉलिश करून दाखवतो असे बाजीराव व त्यांच्या पत्नी कुसुम खेडकर यांना म्हणाले.

त्यातील गोविंद साह म्हणाला की, तुमच्याकडे सोन्याचे दागीने असतील, तर ते आणा, मी तुम्हाला त्याला पॉलीश करून दाखवतो. कुसुम खेडकर यांनी अंगावरचे सोन्याचे दागीने पॉलीश करण्याकरीता दिले असता, आरोपींनी पावडरमध्ये खेडकर यांचे दागिने पॉलिश केले. त्यानंतर आरोपींनी त्यांच्याकडे पावडर असलेल्या प्लॅस्टीकच्या पिशवीमध्ये टाकले.

दागिने पॉलिश केल्यानंतर २० मिनीटे अशा पिशवीमध्ये टाकून पावडरमध्ये ठेवावे लागतात असे म्हणून खेडकर यांची नजर चुकवून दागीने असलेल्या पिशवी सारखीच दिसणारी दुसरी पिशवी खेडकर यांची दागिन्यांची पिशवी आहे, असे भासवले.

तेव्हा हा प्रकार बाजीराव खेडकर यांच्या लक्षात आल्याने ते म्हणाले आमच्या दागिन्यांची पिशवी आम्हाला दे. तेव्हा दोन इसमांपैकी एक इसम पळाला व दागीने पॉलिश करून दाखवणारा इसम देखील पळून जावू लागला असता खेडकर यांनी त्याला पकडले व आरडा-ओरडा केल्याने आजूबाजूचे लोक जमा झाले.

तेव्हा त्याच्याकडे असलेली काळ्या रंगाची बॅग तपासली असता त्यामध्ये खेडकर यांचे दागीने मिळून आले. गोविंद साह या ठगाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पाथर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.