‘ह्या’ तालुक्यात गांजाची अवैध विक्री

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :-  गांजाची खुलेआम विक्री करून तरुण पिढी बरबाद करण्याचे काम शहरात रोज होत आहे. शाळकरी मुलांसहीत यात काही अट्टल गुन्हेगारांना गांजा सहज उपलब्ध होऊ लागला आहे.

ग्रामीण भागातील मुलेही या नशेच्या आहारी जात आहेत. संगमनेर शहरात नुकतीच अवैध गांजा विक्री करणार्‍या युवकांवर कारवाई करण्यात आली परंतु तरीही शहरातील गांजाची अवैध विक्री सुरुच असल्याचे दिसत आहे.

संगमनेर शहरात गेल्या काही महिन्यापासून मोठ्या प्रमाणावर गांजाची खुलेआम विक्री होत आहे. शहरातील तीन नागरिक या व्यवसायाशी संबंधित असून त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी गांजा पुरवला जातो.

एका ठिकाणी गांजा बाहेरून आणला जातो. याठिकाणी गांज्याच्या पुड्या तयार करून वेगवेगळ्या टपर्‍यांवर या पुड्या पाठविल्या जातात. दररोज शेकडो पुड्यांची विक्री होताना दिसत आहे.

या व्यवहारातून दररोज मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत आहे. ह्या सर्व गोष्टींना आळा घालून योग्य कारवाई करावी आणि व्यसनाधीन होत असलेल्या तरुणाईला यातून बाहेर काढावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment