आमदार रोहित पवार स्पष्टच बोलले ! राज्यात धर्माच्या नावावरून…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MLA Rohit Pawar : अध्यात्माच्या माध्यमातून सामाजिक समता, शांतता व प्रेमाच्या सद्भावनेची समाजाला नितांत गरजअसताना आज राज्यात विकासकामाऐवजी धर्माच्या नावावरून जातीय व्देष पसरवरला जातोय. अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र भगवानगड येथील राष्ट्रसंत श्री भगवान बाबा यांच्या समाधीच्या दर्शनानंतर आ.पवार बोलत होते. ते म्हणाले की, संत भगवान बाबांनी दऱ्याखोऱ्यातील वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाजप्रबोधनाचे मोठे काम केले.

शिक्षणाचे महत्व जुन्या काळात जनतेच्या लक्षात आणून दिल्याने या भागातीलच नाही तर महाराष्ट्रातील हजारो लोक सुशिक्षित झाले आहेत. आध्यामातून समाजप्रबोधन करत संत भगवान बाबांनी समाजिक समता व शांतीचा दिलेला संदेश सर्वाच्च असून,

आज त्यांच्याच विचारधारेवर मार्गक्रमण करण्याची निंतात आवश्यकता आहे. आपण सर्वांनी प्राप्त परिस्थिती बदलण्याची धर्मांध नव्हे तर भगवान बाबांच्या समतेची शिकवण अंगीकारली पाहिजे.

राष्ट्रसंत भगवान बाबांच्या दर्शनाने नवीन ऊर्जा व शक्ती प्राप्त होऊन अन्यायाविरोधात लढण्यासाठी प्रचंड प्रेरणा मिळते. आज राज्यात धर्माच्या नावावरून जातीय व्देष पसरवरला जातोय. त्यामुळे अध्यात्माच्या माध्यमातून सामाजिक समता, शांतता व प्रेमाच्या सद्भावनेची समाजाला नितांत गरज आहे.