अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- कोरोनामुळे मला माझा वाढदिवस माझ्या राहुरी तालुक्यात साजरा करता आला नाही. असं बऱ्याच वर्षांनी घडले आहे. दरवर्षी जीवाला जीव देणारे माझे तालुक्यातील आणि मतदारसंघातील कार्यकर्ते हितचिंतक समक्ष भेटून शुभेच्छा देतात.
माझं राहुरी शहर, माझा राहुरी तालुका आणि माझा राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघ म्हणजे माझं कुटुंब आहे. कोरोनाचे गांभीर्य ओळखून प्रत्येकाने स्वत: बरोबरच आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी,
असे आवाहन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले. मंत्री तनपुरे म्हणाले, यावर्षीच्या वाढदिवसाला कुटुंबापासून शरीराने दूर होतो. पण दवाखान्यात असताना मन मात्र कुटुंबाकडेच होते.
करोनामुळे थोडा अशक्तपणा असल्याने फोनवर बोलायलाही मर्यादा होत्या. तरी देखील आपण सर्वांनी सोशल मीडिया, वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि दूरध्वनीद्वारे माझ्यावर शुभेच्छारुपी प्रेमाचा वर्षाव केला.
आपल्या सर्वांच्या प्रेमातून मी उतराई होऊ शकत नाही. आपल्या सर्वांच्या सदिच्छा, आशीर्वाद आणि प्रेम यामुळे मी रुग्णालयातून बाहेर आलो आहे.
परंतु अजुन कोरोना टेस्ट निगेटिव्ह आलेली नाही. त्यामुळे काही दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे. परंतु ऑनलाइन कामकाज चालू ठेवणार असल्याचा संदेश मंत्री तनपुरे यांनी मतदारसंघातील जनतेला दिला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved