…म्हणून जवखेडे तिहेरी खून खटल्याची सुनावणी लांबणीवर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :- राज्यभर गाजलेल्या पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील तिहेरी खून खटल्याची सोमवारी होणारी सुनावणी लांबणीवर पडली आहे.

आरोपींचे वकील सोमवारपासून अंतिम युक्तीवाद सुरू करणार होते. परंतु काही कारणास्तव ते न्यायालयात उपस्थित राहू शकले नाही.

त्यामुळे त्यांनी विनंती अर्ज न्यायालयात सादर केला. त्यामुळे या खटल्याची सुनावणी आता 21 फेब्रुवारी रोजी सुरू होणार आहे.

या खटल्याची सुनावणी प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांच्यासमोर सुरू आहे. या खटल्याचे कामकाज जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे.

सरकार पक्षाच्या वतीने एकूण 53 साक्षीदार तपासण्यात आले आहेत. तसेच सरकारी पक्षाचा अंतिम युक्तीवादही पूर्ण झालेला आहे.