अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारचे गुन्हे घडताना दिसतात. चोर्या, घरफोड्या, दरोडे, रस्तालुटीच्या घटना घडत आहेत. पोलीस प्रशासन यावर जरब बसविण्याचे कार्य करत आहे.
वाहन चोरीचे देखील खूप प्रकार नगरमध्ये घडत असतात. परंतु असल्या वाहनचोरीच्या घटनांनी संपूर्ण राज्यात जाळे केले आहे. राज्यभर या असल्या कृत्यांचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
अशाच एका महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून चारचाकी व दुचाकी वाहनांची चोरी करणार्या टोळीच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आवळल्या आहे.
त्यांच्याकडून चोरीचा 5 चारचाकी व 2 दुचाकीसह 25 लाख 5 हजारांचा ऐवज जप्त केला आहे. हर्षद भगवान गंगतिरे (वय- 28 रा. चंदनझिरे जि. जालना), दिनेश राधाकिसन काठोटे (वय- 32 रा. हनुमान घाट जि. जालना) व संतोष नामदेव सानप (वय- 25 रा. गुंजाळवाडी ता. सिंधखेड राजा. जि. बुलढाणा) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत.
अनिल शिवाजी मेहत्रे (रा. नवनागापूर) यांची चारचाकी चोरीला गेल्याची फिर्याद एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. अनिल मेहत्रे यांची चारचाकी हर्षद गंगतिरे याने इतरांच्या मदतीने चोरी केल्याची माहिती निरीक्षक पवार यांना मिळाली होती. पथकाने जालना जिल्ह्यात जावून गंगतिरे याला अटक केली.
त्याच्याकडे गुन्ह्याबाबत विचारणा केली असता चारचाकी व दुचाकी चोरीबाबत त्याने पोलिसांना माहिती दिली. यासाठी त्याला मदत करणारे दिनेश काठोटे व संतोष सानप यांची नावे समोर आली. पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांना अटक करत त्यांच्याकडे असलेली चोरीचे वाहने जप्त केली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved