सावेडीत महिला चोरट्यांचा सुळसुळाट…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :-जिल्ह्यासह नगर शहरातील सावेडी भागात चोरट्यांचा सुळसुळाट हल्ली वाढला आहे. नगर शहरातील भिस्तबाग चौकातील श्रीनाथ कॉम्प्लेक्समधील आराध्या कलेक्शन या कपड्याच्या दुकानात चोरी झाली आहे.

या दुकानातून 16 हजार 740 रुपयांच्या साड्या दोन अनोळखी महिलांनी चोरल्याची घटना घडली आहे.अर्चना अभिजीत शिंदे (वय 38, धंदा व्यवसाय, रा. भिस्तबाग चौक, पंचवटी नगर) यांनी फिर्याद दिली असून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवार दि. 06 ऑक्टोबर रोजी फिर्यादी अर्चना शिंदे यांचे दुकान नेहमीप्रमाणे साफसफाई करणार्‍या महिलेने उघडले व तिथे साडी खरेदी करण्याच्या उद्देशाने दोन अज्ञात महिला आल्या.

त्यानंतर फिर्यादी शिंदे या दुकानात आल्या असता त्या दोन महिला शिंदे यांना पाहून लगेच त्यांच्या हातातील साड्या काऊंटरवर टाकुन घाईघाईने निघून गेल्या.

शिंदे यांना दुकानातील काही साड्यांची खोकी रिकामी दिसली. कामावरील महिलेने तपासले असता साड्या कमी असल्याचे समजले.

त्यावरून दुकानातील साड्या चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. घटनेत 16 हजार 740 रूपयांची चोरी झाली असून पुढील तपास पोना. कांबळे करत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment