गणिमीकाव्‍याने परिवर्तन करुन, समृध्‍द पारनेर, सुरक्ष‍ित पारनेर निर्माण करण्‍यासाठी आपण सर्वजण पुन्‍हा एकदा प्रयत्‍न करु – डॉ.सुजय विखे पाटील

Ahmednagar News : विकास प्रक्रीयेत आड येणारी प्रवृत्‍ती तालुक्‍यातून बाजुला करण्‍याची हीच वेळ आहे. एकदा चुक केली आता पुन्‍हा करु नका, गणिमीकाव्‍याने परिवर्तन करुन, समृध्‍द पारनेर, सुरक्ष‍ित पारनेर निर्माण करण्‍यासाठी आपण सर्वजण पुन्‍हा एकदा प्रयत्‍न करु. या तालुक्‍याचे उज्‍जल भविष्‍य घडवू असा विश्‍वास महायुतीचे उमेदवार खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला. सुपा येथे आयोजित करण्‍यात … Read more

Sujay Vikhe News : डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या एका मताच्या अधिकारामुळे लोकशाही मजबूत आहे – खा.सुजय विखे पाटील

Sujay Vikhe News : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडर यांना या देशाला दिलेले संविधान ही देशासाठी मोठी देणगी आहे. त्याच बरोबर संविधाने दिलेला सर्वांना समान एक मताचा अधिकार यामुळे देशाची लोकशाही मजबूत आहे. तिला कधीच धोका निर्माण होऊ शकत नाही. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, एक विचारवंत आणि समाजाला दिशा देणारे एक व्यक्तिमत्त्व अशी ओळख असणाऱ्या बाबासाहेबांना माझे … Read more

Nilesh Lanke News : मंदिरात झोपणारा लोकसभेचा उमेदवार पहिल्यांदाच पाहिला ! लोकांना आश्चर्याचा धक्का…

MLA Nilesh Lanke

Nilesh Lanke News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवित असणारे मा. आमदार निलेश लंके यांच्या ‘नगर दक्षिण स्वाभिमान यात्रे’ला नागरीकांचा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. एक एप्रिल रोजी सुरु झालेल्या या यात्रेमध्ये लोक लंके यांना निवडणूक लढविण्यासाठी स्वतःहून यथाशक्ती आर्थिक मदत देखील करीत आहेत. आतापर्यंत हि … Read more

देशात मोदींची गॅरंटी वर लोकांना विश्वास ! भाजपाचे संकल्प पत्र देशाच्या प्रगतीसाठी महत्वपूर्ण – खा.विखे पाटील

लोकसभेच्या निवडणुका ह्या देशाचे भविष्य घडविण्यासाठी असतात. यामुळे मतदारांनी आपले मताचा विचारपुर्वक वापर करून मतदान करावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे संकल्प पत्र देशाच्या प्रगतीसाठी महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास महायुतीचे उमेदवार खा डॉ सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला. महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी राशीन येथे आयोजित बुथ कमिटी व … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : तब्बल ९३ लाखांचे सोने आणि रोख रक्कम जप्त ! लोकसभा निवडणुक आचारसंहिता…

Ahmednagar News : अहमदनगर शहरातून एक धक्कदायक अशी बातमी समोर आली आहे लोकसभा निवडणुक आचारसंहिता कालावधीमध्ये 93,50,097/- रुपये किमतीचे सोने व रोख रक्कम जप्त करण्यात आली असून स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी ही कारवाई केली आहे. प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की,निवडणुक आयोग तसेच जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक आदर्श आचारसंहितेच्या कालावधीमध्ये कोणत्याही इसमाला 50,000/- … Read more

MP Sujay Vikhe Patil : डॉ.सुजय विखे पाटील यांना समाजातील सर्व घटकांचे मोठे पाठबळ ! वयोश्री योजनेची जिल्‍हयात झालेली अंमलबजावणी जमेची बाजु

MP Sujay Vikhe

MP Sujay Vikhe Patil : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या संकल्‍पनेतून राष्‍ट्रीय वयोश्री योजनेची प्रभावी अंमलबजावणी नगर जिल्‍ह्यात झाली. जिल्‍ह्यातील ४५ हजार जेष्‍ठ नागरीकांना या योजनेचा थेट लाभ खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍या पाठपुराव्‍यामुळे झाला.या सर्व जेष्‍ठ नागरीकांचे पाठबळ खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍या पाठीशी भक्‍कमपणे उभे राहील असा विश्‍वास भाजपाचे तालुका अध्‍यक्ष संदीप नागवडे यांनी … Read more

सुजय विखे पाटलांचा पारनेरमध्ये घणाघात ! म्हणाले माझ्याकडे सांगण्‍यासाठी विकास कामे आहेत, समोर मात्र फक्‍त दहशत…

Sujay Vikhe Patil News

Sujay Vikhe Patil News : दहा वर्षे मुख्‍यमंत्री आणि पंधरा वर्षे केंद्रात मंत्री असतानाही नगर जिल्‍ह्यासाठी एकही काम जेष्‍ठ नेते करु शकले नाही आता त्‍यांनी दिलेला उमेदवार तरी आता काय करणार असा सवाल महायुतीचे उमेदवार खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी उपस्थित केला. माझ्याकडे सांगण्‍यासाठी विकास कामे आहेत, समोर मात्र फक्‍त दहशत असल्‍याचा टोला त्‍यांनी लगावला. … Read more

महाविकास आघाडीच्‍या नेत्‍यांकडे विकासाचे कोणतेही धोरण नाही, देशाचा पंतप्रधान कोण? यांचा चेहरा नाही – सुजय विखे पाटील

राज्‍यात महायुतीचे ४५ हुन अधिक जागांवर मोठ्या मताधिक्‍याने विजयी होणार आहेत. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीत अद्यापही जागा वाटपावरुन वाद सुरू आहेत. विकासाच्‍या मुद्यावर तिस-यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्‍यासाठी सामान्‍य माणूस महायुतीच्‍या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार राहील असा विश्‍वास खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला. तालुक्‍यातील माळी बाभूळगाव येथील “मेरा बुथ सबसे मजबूत” या कार्यक्रमात … Read more

अहमदनगर मध्ये ईदगाह मैदानावर पॅलेसस्टाईनचा झेंडा ! पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले…

रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर नगर शहरात ईदगाह मैदानावर पॅलेसस्टाईनचा झेंडा फडविण्यात आल्याची घटना अतिशय गंभीर असून, या प्रकाराची सखोल चौकशी करुन, घटनेमागील खरे सुत्रधार पोलिसांनी शोधून काढण्याची आवश्यकता असल्याचे महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. मंत्री ‍विखे पाटील यांनी या घटनेचा तिव्र शब्दात निषेध करुन राज्यात व जिल्हयात रमजान ईदचा सण उत्साहात साजरा … Read more

फक्त पोपटपंची करून निवडणूक जिंकता येत नाही वैद्य यांचा लंकेंना टोला ! शेवगाव तालुक्यात सुजय विखे यांना लाखाचे मताधिक्य देणार

Ahmednagar News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दहा वर्षांची कारकीर्द चांगली असल्यामुळे तिसर्‍यांदा ते पंतप्रधान होणार आहेतच. त्यांचे हात बळकट करण्यासाठी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांना विजय करण्यासाठी महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन भाजपाचे तालुका अध्यक्ष तुषार वैद्य यांनी केले. आमदार मोनिकाताई राजळे, माजी आमदार नरेंद्र … Read more

राधाकृष्ण विखे पाटील स्पष्टच बोलले ! बाळासाहेब थोरातांची आता किव येते कारण त्यांना स्वताच्या जिल्ह्यात…

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : मुठभर लोकांनी स्वताच्या फायद्याकरिता क्रॉंग्रेस पक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे गहाण ठेवल्याचा गंभीर आरोप राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. काॅग्रेस मधील काही नेते स्वताचे नेतेपद टिकवण्यासाठी काम करत असून त्यांना पक्षाचे काही घेणेदेणे राहिले नसल्याची टीकाही त्यांनी केली. बुथ सक्षमिकरण अभियानाच्या निमिताने तालुक्यातील आश्वी बुद्रुक, उमरी बाळापूर … Read more

नगर जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा तयार ! औद्यगिक विकासाला प्राधान्य, विखे पाटलांनी स्पष्टच सांगितलं…

विकासाचा सांख्यिकी आरखडा तयार करणारा अहील्यानगर जिल्हा राज्यात पहीला असून,औद्योगिक आणि तिर्थ क्षेत्र पर्यटनातून होणारी गुंतवणूक व्यापारी पेठेवरही सकारात्मक परीणाम करण्यास कारणीभूत ठरेल असा विश्वास महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. अहील्यानगर आडते बाजार मर्चन्टस असोसिएशन व कांदा भाजीपाला फळे फुले अडत्यांचे असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मंत्री विखे पाटील … Read more

Ahmednagar Politics : निलेश लंके यांच्या त्रासाला कंटाळून किती कंपन्या सोडून गेल्या याची यादी जाहीर करणार !

जिल्ह्यातील रोजगाराच्या प्रश्नावरून विरोधकांनी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर केलेल्या टीकेचा पारनेर भाजपचे विधानसभा प्रमुख विश्वनाथ कोरडे यांनी चांगलाच समाचार घेतला. धाक दडपशाहीने उद्योजकांना पिटाळून लावऱ्यांनी विकासाच्या गप्पा मारू नये. निलेश लंके यांनी सुपा एमआयडीत किती कंपन्या आणल्या सांगावे अथवा त्यांच्या जाचाला कंटाळून किती कंपन्या सोडून गेल्या याची यादी जाहीर करतो असे सरळ आव्हान … Read more

राज ठाकरे यांनी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला ! देशात फक्त मोदींची गॅरेंटी सुरू

राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या निमित्त शिवतिर्थीवर आयोजित सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता महायुतीचा घटक पक्ष झाल्याने महायुतीला अधीक बळकटी मिळेल असा विश्वास अहिल्यानगरचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील व्यक्त केला आहे. राज ठाकरे यांनी काल मुंबईतील शिवाजी पार्क येथील सभेत काय बोलणार याकडे … Read more

Ahmednagar Breaking : अहमदनगर मध्ये ईडीची सर्वात मोठी कारवाई ! ‘त्यांच्या’ करोडोंच्या मालमत्ता केल्या जप्त

Ahmednagar ED Raid

Ahmednagar Breaking : सक्तवसुली संचालनालयान अर्थात ईडी या तपास यंत्रणेचे नाव सर्वश्रुत आहे. सध्या अनेक नेत्यांची चौकशी ईडीमार्फत सुरु असते. दरम्यान आता या ईडीने अहमदनगर जिल्ह्यात सर्वात मोठी कारवाई केली आहे. मल्टी लेव्हल मार्केटिंग योजनेच्या माध्यमातून करोडोंची फसवणूक झाली असून साधारण ही गुंतवणूकदारांची फसवणूक सुमारे १२५ कोटींची असल्याची माहिती मिळाली आहे. मूळ नगर जिल्ह्यातील रहिवासी … Read more

सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ पनवेलमध्ये सभा ! निवडणूक ही परिवर्तनाची असून दहशतवादी प्रवृत्ती संपवणारी…

MP Sujay Vikhe

MP Sujay Vikhe : डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ पनवेल मधील कामोठे नगरी परिसरात परिवार संवाद सभेचे काल आयोजन करण्यात आले होते. यावेळी कामोठेकरांनी डॉ. सुजय विखे पाटील यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. हजारो नागरिकांच्या वतीने डॉ. सुजय पाटील यांची भव्य मिरवणूक काढत त्यांचा सन्मान करण्यात आला.आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी आम्ही … Read more

खा.सदाशिव लोखंडेंकडून पदाचा गैरवापर ! स्वतःच्या कुटुंबासाठी कोट्यावधी रुपयाचे अनुदान

MP Sadashiv Lokhande

शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या विकासासाठी नाबार्ड व अन्य संस्थांकडे असलेला निधी आमदार, खासदार आणि प्रभावशाली व्यक्ती लाटत आहेत. असे बेकायदेशीर कर्ज वितरण करणाऱ्या सर्व संस्थांची कॅग, इडी सारख्या यंत्रणेमार्फत चौकशी करून नियम डावलून अनुदान मिळवणाऱ्या व्यक्ती व वितरण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट व नेवासा तालुका … Read more

पाच वर्षात जिल्ह्यात झालेली विकासकामे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच प्रचाराचा अजेंडा – डॉ. सुजय विखे पाटील

MP Sujay Vikhe

केवळ विकास हेच माझे ध्येय आहे आणि केवळ विकासासाठीच मी तुमच्याकडे मते मागणार आहे. असे प्रतिपादन भाजप आणि महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. भाजपच्या वर्धापन दिनाच्या निमित्य आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. मागील पाच वर्षात आपण केलेल्या विकास कामाच्या जोरावर आपण मतदारांसमोर जाणार असून केवळ विकासाचीच कामे लोकांना सांगा असा संदेश … Read more