राधाकृष्ण विखे पाटील स्पष्टच बोलले ! बाळासाहेब थोरातांची आता किव येते कारण त्यांना स्वताच्या जिल्ह्यात…

Ahmednagarlive24
Published:
Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : मुठभर लोकांनी स्वताच्या फायद्याकरिता क्रॉंग्रेस पक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे गहाण ठेवल्याचा गंभीर आरोप राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. काॅग्रेस मधील काही नेते स्वताचे नेतेपद टिकवण्यासाठी काम करत असून त्यांना पक्षाचे काही घेणेदेणे राहिले नसल्याची टीकाही त्यांनी केली.

बुथ सक्षमिकरण अभियानाच्या निमिताने तालुक्यातील आश्वी बुद्रुक, उमरी बाळापूर येथे मंत्री विखे पाटील यांनी बुथ प्रमुख तसेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी संवाद साधला. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

ज्या ठिकाणी पक्षाचे प्राबल्य आहे अशा जागा सोडून द्यायचा स्वताच्या फायद्यासाठी नको तिथे उमेदवार देण्याचे काम राज्यातील काॅग्रेसी नेत्यांनी केले असल्याकडे लक्ष वेधून, बाळासाहेब थोरात स्वताला जेष्ठ नेते समजतात पण थोरातांची आता किव येते कारण त्यांना स्वताच्या जिल्ह्यात एकही जागा मिळवता आली नाही.

उत्तर महाराष्ट्रात ८ जागा असताना तिथे ही काॅग्रेसला एकही जागा मिळाली नाही.यामुळे थोरातांनी काय काम केले? असा सवाल विखे पाटील यांनी केला.

नगर जिल्ह्यात काॅग्रेसला का जागा मिळाली नाही याची कारणे लोकांना आणि कार्यकर्त्यांना थोरातांनी सांगितली पाहिजेत असे थेट आव्हान देवून,सांगलीच्या जागेसाठी आग्रही असणाऱ्या थोरातांनी स्वताच्या नगर जिल्ह्यात पक्षाचे काय चालले आहे याकडे लक्ष द्यावे असा सल्ला सुद्धा त्यांनी यावेळी थोरातांना दिला.

हे पण वाचा…

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe