MP Sujay Vikhe : कोवीड काळात सुजय विखे पाटलांनी काय काय केलं ? सगळंच सांगितलं…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MP Sujay Vikhe : कोव्हीड संकटात सर्व उपाय योजना आणि समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाण्याची भूमिका डॉक्टर या नात्याने खा.सुजय विखे पाटील यांनी घेतली.कुठेही स्टंटबाजी न करता त्यांनी जपलेल्या सामाजिक बांधिलकीला जनता भक्कमपणे साथ देईल असा विश्वास डॉ मृत्युंजय गर्जे यांनी व्यक्त केला.

खा डॉ सुजय विखे यांची उमेदवारी अहिल्यानगर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असून मागील पाच वर्षात झालेल्या विकास कामामुळे भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांना पुन्हा उमेदावारी देण्यात आल्याने या मतदार संघातील जनता खा.विखे यांना समर्थन देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

रेमडीसिव्हर इंजक्शनची उपलब्धता

नगर येथे पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील रुग्णालयात स्वतंत्र कोव्हीड सेंटर सुरू करून जिल्ह्यातील रुग्णांना उपचारांची सोय उपलब्ध करून दिली.रूग्णांना प्राणवायू उपलब्ध होत नव्हता आशा काळात स्वतंत्र असा आॅक्सिजन प्रकल्प सुरू केला. रेमडीसिव्हर इंजक्शनची उपलब्धता प्रत्येक रुग्णाला करून दिली.यामध्ये त्यांच्यावर आरोप करून बदनाम करण्यचा प्रयत्न झाला.पण थोडेही विचलित न होता खा.डॉ विखे पाटील कोव्हीड योध्दा म्हणून काम करीत राहीले.

सातशेहून अधिक महीलांच्या प्रसूती

कोव्हीड कालावधीत इतर सर्व रुग्णालय बंद असताना खा.डॉ विखे यांनी विखे पाटील रूग्णालयात सुमारे सातशेहून अधिक महीलांच्या प्रसूती मोफत करून देत सामाजिक सामाजिक बांधिलकी जोपासली.

किरणा किटचे गरजू व्यक्तिना वाटप

सिंधू अन्नछत्र मोफत किरणा किटचे गरजू व्यक्तिना वाटप केले. जिल्ह्यातील २७० शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत.या कुटूबियांना दतक घेवून त्यांच्या परीवारात रोजगार आणि शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने या कुटूबियांची मोठी समस्या दूर करण्यात खा.विखे यांनी घेतलेली भूमिका सर्वाच्या दृष्टिने अभिमानास्पद राहील्याचे भाजपा पाथर्डी तालुकाध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे यांनी सांगितले

कोव्हीड योध्दा म्हणून उभे राहीले

कोव्हीड संकटात केंद्र सरकारने खासदारांना मिळणारा सर्व निधी कोव्हीड फंडासाठी वापरण्यात आला. परंतू निधी नाही म्हणून कोणतेही कारण न सांगता खा.विखे अविरतपणे कोव्हीड संकटात मतदार संघातील जनतेच्या पाठीशी कोव्हीड योध्दा म्हणून उभे राहीले हे महत्वपूर्ण आहे.

डॉक्टर या नात्याने बजावलेली भूमिका

कारण राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते.परंतू कोव्हीड संकटातील उपाय योजना होवू शकल्या नव्हत्या.पण खा.विखे यांनी उपलब्ध असलेल्या सुविधांचा उपयोग करून कोव्हीड संकटावर मात करण्यासाठी केलेले प्रयत्न लक्षवेधी होते.कुठेही प्रसिध्दीचा डामडौल आणि स्टंट बाजी न करता डॉक्टर या नात्याने त्यांनी बजावलेली भूमिकाच लोकांना भावली असल्याचे भाजपा पाथर्डी तालुकाध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे म्हणाले.

तीन पिढ्यांचा वारसा

विखे पाटील परीवाराच्या सामाजिक बांधिलकीची मोठी परंपरा असून तीन पिढ्यांचा वारसा खा.डॉ सुजय विखे पुढे घेवून जात आहेत.राजकारणाच्या पलीकडे जावून विखे पाटील परीवार कोणत्याही संकटात समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाण्याची घेत असलेल्या भूमिकेला जनता चांगले पाठबळ देईल असा विश्वास यांनी व्यक्त केला.