देशात मोदींची गॅरंटी वर लोकांना विश्वास ! भाजपाचे संकल्प पत्र देशाच्या प्रगतीसाठी महत्वपूर्ण – खा.विखे पाटील

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

लोकसभेच्या निवडणुका ह्या देशाचे भविष्य घडविण्यासाठी असतात. यामुळे मतदारांनी आपले मताचा विचारपुर्वक वापर करून मतदान करावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे संकल्प पत्र देशाच्या प्रगतीसाठी महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास महायुतीचे उमेदवार खा डॉ सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला. महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी राशीन येथे आयोजित बुथ कमिटी व कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन केले. आमदार राम शिंदे अंबादास पिसाळ यांच्यासह भाषण झाले. तसेच पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मागील १० वर्षाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने जगभरात नाव लौकिक मिळवला आहे. विविध योजनांच्या माध्यमातून सामान्यातील सामान्य माणसाला बळ देण्याचे काम मोदी सरकारच्या काळात झाले आहे. देशात मोदींची गॅरंटी वर लोकांना विश्वास आहे.

गेल्या काही वर्षांत देशात योजनांचा मोठा लाभ सामान्य माणसाला झाला. लाभार्थीना योजनेचा लाभ मिळाल्याने योजनेत भ्रष्टाचाराचा आरोप होवू शकला आयुष्यमान भारत मोफत धान्य या प्रमुख योजनांमुळे कमतरता दूर करण्यात केंद्र सरकारला मोठे यश आल्याचे सांगून त्याच वेळी, स्वच्छ भारत मिशन आणि जल जीवन मिशन सारख्या उपक्रमांमुळे देशभरातील स्वच्छता आणि प्रत्येक घराला नळाद्वारे शुध्द पिण्याचे पाणी मिळवून देण्याचे काम सुरू आहे.

सौभाग्य, प्रधानमंत्री आवास योजना ,प्रधानमंत्री जन धन योजना, आणि समग्र शिक्षा धोरण यांसारख्या उपक्रमांनीही सामाजिक विकासाला मोदीनी गती दिली.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने जाहीर केलेले संकल्प पत्र ही मोदीची गॅरंटी असून,सुरू असलेल्या योजना पुढे घेवून जाताना नव्याने योजना बाबत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करून देश प्रगतीपथावर नेण्यासाठी मोदी सरकार यशस्वी होईल असा विश्वास खा.विखे पाटील यांनी व्यक्त केला.

नवमतदारांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवावा…
नवमतदारांना आवाहन करताना खा. सुजय विखे पाटील म्हणाले की, तरुणांनी पंतप्रधान मोंदीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवावा. कारण देशाच्या प्रगतीत मोठा वाटा असलेल्या तरुणांसाठी विकसित भारत हे स्वप्न आहे. आणि केवळ पंतप्रधान मोंदीच हे स्वप्न पुर्ण करू शकतात असा ठाम विस्वास त्यांनी व्यक्त केला.भारत आज जगातील टॉप थ्री स्टार्टप इको सिस्टिममध्ये आला आहे. त्यात तरुणांची ताकद आहे. भारत जगातील मॅन्युफॅक्चरींग हब बनत आहे. त्यात तरुणांचे योगदान मोठे आहे. यासाठी त्यांनी आपला नेता निवडताना विचारपुर्वक मतदान करण्याचे करावे.