आता भरपूर डिस्काउंट तर जानेवारीत येतील नवीन मॉडेल ! कार डिसेंबरमध्ये घ्यावी की जानेवारीत? पहा..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आजकाल स्वतःची कार असणे ही एक गरजच बनली आहे. पूर्वी ते एक फॅशन किंवा एक स्टेट्स साठी खरेदी केली जायची. परंतु आताच्या धकाधकीच्या जीवनात कार घेणे एक कुटुंबासाठी गरज बनली आहे.

सध्या कर विक्रीचा रेट जर पाहिला तो देखील वाढला आहे. आता सध्या डिसेंबर एंडिंगमुळे अनेक कंपन्यांनी कार विक्रीसाठी ऑफरचा पाऊस पाडला आहे. तर सध्या अनेक कंपन्यांनी जानेवारीपासून कार च्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडला असेल की कार कधी विकत घ्यावी? आता घ्यावी की जानेवारीत नववर्षात घ्यावी. चला येथे यावर सविस्तर माहिती पाहुयात.

जबरदस्त डिस्काउंटमुळे कार खरेदी करणे फायदेशीर

एक प्रसिद्ध सेल्स मॅनेजर अभय सिंह यांनी सांगितले आहे की, अनेक कंपन्या डिसेंबरमध्ये कार वर विविध सूट, डिस्काउंट देत आहेत. लोकांना कॅश, एक्सचेंज ऑफर आदींमुळे प्रचंड सूट मिळत आहे.
यासोबतच डीलर्स देखील आपल्या पद्धतीने विविध गिफ्ट देत आहेत.

उदाहरण म्हणून पाहायचं झालं तर Mahindra XUV400 EV वर 4.2 लाख रुपयांची सूट, Hyundai च्या Kona EV वर 3 लाख रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे. यासोबतच मारुती सुझुकी, टाटा मोटर्स आणि रेनॉल्टसह अनेक कार वर सध्या डिस्काउंट मिळत आहे. त्यामुळे जर आता कार घेतली तर प्राचीन लाभ मिळेल.

डिस्काउंट का दिला जातो?

डिस्काउंट देण्यामागे देखील मोठे गणित आहे. डिसेंबरअखेर म्हणजे वर्षाच्या अखेरीस सूट देऊन कंपन्या आपल्या विक्रीचे टार्गेट पूर्ण करत असतात. जो स्टॉक उरलाय तो संपवण्याचा प्रयत्न असतो.
कंपन्या शक्यतो ज्या कार मागील महिन्यात कमी विकल्या गेल्या किंवा कमी लोकप्रिय आहेत अशा कार वर डिस्काउंट देते. आणखी एक पॉलिसी म्हणजे अनेक लोक डिस्काउंटच्या चक्करमध्ये आवश्यकता नसतानाही आपल्या जुन्या कार विकून नवीन कार घेतात.

वेटिंग केली तर मिळेल नवीन अपडेटेड व्हर्जन

डिसेंबरमध्ये कार खरेदी करणे म्हणजे आहे ते मॉडेल खरेदी करणे. जानेवारीमध्ये व आगामी काही महिन्यात अनेक नवीन कार व त्यांचे नवीन अपडेटेड कार लॉन्च करणार आहेत. त्यामुळे तो फायदा घ्यायचा असेल तर वेटिंग केलेली बरी. त्यामुळे आता तुम्हाला कोणते मॉडेल हवे आहे? नवीन घ्यायचे की आहे तेच घ्यायचे? डिस्काउंट घ्यायचा की जास्त किमती द्यायच्या हे तुम्ही स्वतः ठरवायचे आहे.