Best Mileage Bike: 150-160cc क्षमतेच्या दमदार मायलेज देणाऱ्या बाईकच्या शोधात आहात का? तर घ्या ‘या’ बाईक आणि वाचवा पैसे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Best Mileage Bike:- सध्या अनेक कंपन्यांच्या बाईक बाजारपेठेत असून प्रत्येक बाईकच्या किमती या वेगवेगळ्या आहेत. वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून 100cc पासून तर 150 ते 160 सीसी क्षमतेच्या अनेक बाईक तयार करण्यात आलेला असून वैशिष्ट्यानुसार त्या बाईकच्या किमती देखील वेगवेगळ्या असतात.

ज्या कोणाला बाईक खरेदी करायची असते तेव्हा व्यक्ती ती बाईक किती सीसीची आहे? तिची किंमत काय आणि सगळ्यात अगोदर महत्त्वाचे म्हणजे तिचे मायलेज किती किंवा ती मायलेज किती देते? इत्यादी गोष्टी पाहिल्या जातात व त्यानंतर बाईक कोणती खरेदी करावी याबाबत निश्चित केली जाते.

यामध्ये बाईकसाठी आपल्याला एकदाच पैसा खर्च करायला लागतो. परंतु पेट्रोल साठी आपल्याला प्रत्येक वेळेस बाईकला खर्च करणे गरजेचे असते व त्या दृष्टिकोनातून बाईकचे मायलेज हे खूप महत्त्वपूर्ण भूमिका पार पडते.

चांगले दमदार मायलेज देणारी बाईक असेल तर पेट्रोलमध्ये बचत होऊन जास्तीत जास्त पैसा आपल्याला वाचवता येतो. त्यामुळे जास्त मायलेज देणाऱ्या बाईकच्या शोधात प्रत्येकजण असतात.

त्यामुळे आपण या लेखामध्ये 150 ते 160 सेगमेंटमध्ये उत्तम आणि दमदार मायलेज देणाऱ्या बाईकची माहिती घेणार आहोत.

 या आहेत उत्तम मायलेज देणाऱ्या बाईक

1- होंडाची युनिकॉर्न आणि SP160- होंडाची 150 ते 160 सीसी सेगमेंटमध्ये युनिकॉर्न आणि SP160 या महत्वपूर्ण बाईक असून या दोन्ही मॉडेल 162.7cc, सिंगल सिलेंडर, एअर कुल्ड इंजिन सह येतात. हे इंजन युनिकॉर्न मध्ये 60kmpl इतके मायलेज देऊ शकते तर SP160 मध्ये 65KMPL इतके मायलेज देणारे आहे.

2- टीव्हीएस अपाची RTR 160- या बाईकमध्ये 159.7cc क्षमतेचे एअर कुल्ड इंजिन असून जे 15.82 बीएचपी आणि 13.85 एनएम आउटपुट करते. टीव्हीएस कंपनी या बाईक बद्दल दावा करते की ही बाईक 60KMPL इतके मायलेज देते.

3- बजाज पल्सर N 160- बजाजची पल्सर ही बाईक लोकांमध्ये खूप प्रसिद्ध असून तिला बऱ्याच जणांकडून मोठ्या प्रमाणावर पसंती देखील दिली जाते. यातील बजाज पल्सर एन 160 ही बाईक 51.6 किमी प्रति लिटर मायलेज देते व या बाईकची एक्स शोरूम किंमत एक लाख 33 हजार रुपये इतकी आहे.

4- हिरो एक्स्ट्रीम 160R- ही बाईक 160 सीसी क्षमतेची असून यामध्ये एअर कुल्ड इंजिन आहे. जे 8500 आरपीएम वर पंधरा बीएचपी आणि 6500 आरपीएमवर 14 एनएम टॉर्क जनरेट करते. ही बाईक साधारणपणे 49 किलोमीटर प्रतिलिटर इतके मायलेज देते.

5- बजाज पल्सर N 150- बजाजची पल्सर एन 150 ही पल्सर एन 160 पेक्षा कमी मायलेज देते. ही एक न्यू जनरेशन बाईक असून ती 47 किलोमीटर प्रति लिटर मायलेज देते असा कंपनीच्या माध्यमातून दावा करण्यात आला आहे.