गुड न्युज ; ‘या’ आठवड्यात लॉन्च होणार जबरदस्त कार, बाईक, स्कूटर !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Auto News : जर तुम्ही नवीन वर्षात नवीन वाहन खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर थांबा ! आधी ही संपूर्ण बातमी एकदा वाचा. मिळालेल्या माहितीनुसार, नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातील ऑटो सेक्टरमधील महत्त्वाच्या कंपन्या बाईक आणि कार लॉन्च करणार आहेत. या चालू आठवड्यातच ऑटो सेक्टर मधील दिग्गज आणि नामांकित कंपन्या नवीन फोरविलर, टू व्हीलर लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. यामुळे जर तुम्हीही नवीन वर्षात नवीन टू व्हीलर किंवा कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर खरेदीपूर्वी ही बातमी तुम्ही वाचलीच पाहिजे.

मिळालेल्या माहितीनुसार, यामाहा, सिम्पल एनर्जी आणि गोगोरो कंपनी लवकरच आपली नवीन वाहने लाँच करणार आहेत. किया सॉनेट देखील आपली नवीन कार बाजारात लॉन्च करणार आहे. निश्चितच, नवीन वर्ष सुरू होण्याच्या आधीच ही वाहने बाजारात दाखल होणार असल्याने ग्राहकांसाठी ही निश्चितच आनंदाची बातमी ठरणार आहे.
गोगोरो क्रॉसओवर : ही एक तैवानची कंपनी आहे.

ही कंपनी भारतीय बाजारात हळूहळू आपला जम बसवण्याच्या तयारीत आहे. याची सुरुवात देखील झाली आहे. अशातच आता ही तैवानची कंपनी उद्या एक मोठा धमाका करणार आहे. एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आलेल्या माहितीनुसार, ही कंपनी उद्या देशात क्रॉसओवर अॅडव्हेंचर इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार आहे.

विशेष म्हणजे कंपनीची ही इलेक्ट्रिक स्कूटर 7.5kW ची इलेक्ट्रिक मोटर आणि दोन अदलाबदल करण्यायोग्य बॅटरी पॅकसह बाजारात उतरवली जाणार आहे. असं सांगितलं जात आहे की एकदा ही स्कूटर चार्ज केली की 100 किलोमीटर पर्यंतचा रन कापणार आहे. जवळपास 100KM ची रेंज असल्याने ही स्कूटर निश्चितच सर्वसामान्य ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करणार असा दावा कंपनीच्या माध्यमातून केला जात आहे.

किया सोनेट फेसलिफ्ट : Kia ही कंपनी अल्पावधीतच भारतीय ऑटोमोबाईल सेक्टर मध्ये आपला एक दबदबा तयार करून गेली आहे. आतापर्यंत कंपनीच्या अनेक गाड्यांना ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. ग्राहकांच्या पसंतीस ही कंपनी खरी उतरली आहे. दरम्यान ही कंपनी लवकरच Sonet फेसलिफ्ट 2024 बाजारात लॉन्च करण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार कंपनीची ही कार भारतीय बाजारात लॉन्च होण्यापूर्वी ग्लोबली लॉन्च होणार आहे.

14 डिसेंबर 2023 रोजी बाजारात लॉन्च होण्यापूर्वी जागतिक स्तरावर ही कार लॉन्च होईल असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे. ही कार चाचणी दरम्यान अनेक वेळा दिसून आली आहे. या गाडीची झलक अनेकांना आवडली देखील आहे. या कारमध्ये C-आकाराचे LED डेटाइम रनिंग लाइट्स, रीडिझाइन केलेले ग्रिल सेक्शन आणि हेडलॅम्प, नवीन बंपर, कारच्या आतील भागात नवीन टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अपडेटेड सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, सहा एअरबॅग्ज, ADAS, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल इत्यादी फीचर्स राहणार आहेत. यामुळे ही गाडी ग्राहकांना पसंत पडेल असा कंपनीचा दावा आहे.

Simple Dot One : सिंपल एनर्जी ही कंपनी लवकरच इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार आहे. ही कंपनी देखील इलेक्ट्रिक स्कूटर च्या सेगमेंटमध्ये आपला जम बसवू पाहत आहे. आता इलेक्ट्रिक स्कूटर च्या सेगमेंट मध्ये देखील ऑटो सेक्टर मध्ये नामांकित कंपन्यांनी एन्ट्री केली आहे. यामुळे ही स्कूटर नामांकित कंपन्यांशी स्पर्धा करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सिम्पल एनर्जी कंपनीची सिम्पल डॉट वन ही इलेक्ट्रिक स्कूटर 15 डिसेंबर 2023 ला लॉन्च केली जाऊ शकते.

ही देशातील एक प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटर राहणार असून याची किंमत 1 लाख रुपयांपेक्षा कमी राहिल असा अंदाज तज्ञ लोकांच्या माध्यमातून वर्तवला जात आहे. ही स्कूटर Ola S1X या स्कूटर सोबत स्पर्धा करेल असा अंदाज आहे. यावर्षी ही गाडी लॉन्च होणार असली तरी देखील ग्राहकांसाठी ही गाडी नवीन वर्षातच उपलब्ध होईल असा अंदाज आहे.

यामाहा R3 आणि MT-03 : यामाहा ही कंपनी देखील या आठवड्यात दोन धमाकेदार बाईक्स लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. यामाहा ही देशातील एक ऑटो सेक्टर मधील नामांकित कंपनी असून या कंपनीच्या बाईक्स नवयुवकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. स्पोर्ट बाईक बनवणारी ही कंपनी या चालू आठवड्यात मोठा धमाका करेल आणि आपल्या मोस्ट अवेटेड Yamaha R3 आणि MT-03 ची लॉन्चिंग करणार असा दावा केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कंपनीच्या या दोन्ही गाड्या 15 डिसेंबर 2023 ला लॉन्च केल्या जाऊ शकतात. हे दोन्ही मॉडेल्स कम्प्लिटली बिल्ट युनिट (CBU) मार्गाने आयात केले जातील आणि 321cc समांतर ट्विन-सिलेंडर लिक्विड-कूल्ड DOHC इंधन-इंजेक्‍ट इंजिनद्वारे समर्थित असतील असा अंदाज आहे.