टाटा मोटर्सच्या ‘या’ लोकप्रिय सीएनजी कारला आली मोठी मागणी, 24 महिन्यात विकले गेले तब्बल 1.30 लाख युनिट, फिचर्स अन प्राइस लिस्ट चेक करा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tata Motors CNG Car : टाटा मोटर्स देशातील एक लोकप्रिय कार निर्माता कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक वाहनांना ग्राहकांनी भरभरून असे प्रेम दिले आहे.

कंपनीचे अनेक प्रवासी वाहन ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. यामध्ये टाटा मोटर्सच्या दोन सीएनजी कारचा देखील समावेश होतो.

टियागो आणि टिगोर सीएनजी हे कंपनीचे लोकप्रिय मॉडेल आहे. दरम्यान कंपनीने या मॉडेलची लोकप्रियता पाहता हे दोन्ही CNG मॉडेल ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह बाजारात लॉन्च केले आहेत.

विशेष म्हणजे ही गाडी भारतातील पहिली ऑटोमॅटिक सीएनजी कार ठरली आहे. दरम्यान टाटा कंपनीच्या पोर्टफोलिओ मध्ये तुम्हाला अनेक सीएनजी मॉडेल पाहायला मिळतील.

टियागो, टिगोर, अल्ट्रोज आणि पंच या गाड्या सीएनजी वॅरियंटमध्ये उपलब्ध आहेत. दरम्यान कंपनीने गेल्या 24 महिन्यांच्या काळात तब्बल 1.30 लाख सीएनजी कारची विक्री केली असल्याची माहिती समोर आली आहे.

यावरून कंपनीच्या सीएनजी गाड्यांची लोकप्रियता आपल्याला लक्षात येते. दरम्यान आता आपण कंपनीच्या या सीएनजी गाड्यांपैकी हॉट सेलिंग असलेल्या टाटा टियागो आणि टाटा टिगोर या गाड्यांची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Tiago अन Tigor CNG चे स्पेसिफिकेशन अँड फीचर्स

या गाड्यांमध्ये ट्वीन सिलेंडर सीएनजी किट बसवण्यात आली आहे. या गाड्या 27 किलोमीटर प्रति किलोग्राम एवढे मायलेज देण्यास सक्षम आहेत.

हे दोन्ही सीएनजी मॉडेल ऑटोमॅटिक वेरियंट मध्ये आता बाजारात उपलब्ध होत आहेत. कंपनीकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, टाटाच्या या CNG गाड्यांमध्ये 1.2-लीटर NA पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.

यात ट्विन सीएनजी सिलिंडर उपलब्ध आहेत. त्याची क्षमता 30-लिटर सीएनजी आहे. तर कंपनीने अलीकडेच ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह Tiago आणि Tigor चे CNG मॉडेल उपलब्ध करून दिले आहे.

मिळतोय 75 हजाराचा डिस्काउंट

मीडिया रिपोर्टनुसार, टाटा मोटर्स या महिन्यात त्यांच्या लोकप्रिय हॅचबॅक टियागो आणि सेडान टिगोरच्या CNG प्रकारांवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट ऑफर करत आहे. या महिन्यात, ग्राहकांना कंपनीच्या डीलरशिपवर रोख सवलत, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट डिस्काउंट यांचा लाभ मिळत आहे.

या दोन्ही गाड्यांवर 75 हजार रुपयांचा डिस्काउंट ऑफर मिळत आहे. Tata Tiago आणि Tigor CNG च्या सिंगल-सिलेंडर प्रकारांवर 60,000 रुपयांपर्यंतची रोख सवलत आणि 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस उपलब्ध आहे.

म्हणजेच या दोन्ही सीएनजी मॉडेलच्या सिंगल सिलेंडर कारवर कंपनीकडून 75000 पर्यंतचा डिस्काउंट ऑफर दिला जात आहे.

त्याचप्रमाणे, कंपनी ट्विन-सिलेंडर प्रकारावर रु. 35,000 ची रोख सूट आणि रु. 15,000 चे एक्सचेंज बोनस ऑफर करत आहे. म्हणजेच कंपनीकडून ट्विन सिलेंडर प्रकारावर 50 हजारापर्यंतची डिस्काउंट ऑफर मिळत आहे.