Top 5 Electric Tractor : ‘ही’ आहेत भारतातील टॉप 5 इलेक्ट्रिक ट्रॅक्टर! वाचा ‘या’ ट्रॅक्टरांची किंमत आणि वैशिष्ट्ये

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Top 5 Electric Tractor:- आता मोठ्या प्रमाणावर भारतात वेगवेगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वाढताना दिसून येत असून शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टरचा वापर केला जातो. परंतु आता बरेच शेतकरी शेतीमध्ये ट्रॅक्टर वरचा खर्च वाचवण्याकरिता इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचा वापर करताना दिसून येत आहेत.

कारण इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचा विचार केला तर डिझेलवर पेट्रोल ट्रॅक्टरपेक्षा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर चालवण्यासाठी खूप कमीत कमी खर्च येतो. कारण ते बॅटरीच्या माध्यमातून ऑपरेट होत असतात. त्यामुळे बरेच शेतकरी आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टरच्या शोधात आहेत.

तुम्हाला देखील शेती करिता चांगला परफॉर्मन्स असणारा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर खरेदी करायचा असेल तर या लेखामध्ये आपण अशाच महत्त्वपूर्ण अशा भारतातील टॉप पाच इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची महत्वाची माहिती घेणार आहोत.

हे आहेत भारतातील टॉप पाच इलेक्ट्रिक ट्रॅक्टर

1- सोनालीका टायगर इलेक्ट्रिक ट्रॅक्टर- सोनालिकाच्या या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला 25.5KW बॅटरी असलेली शक्तिशाली मोटर मिळते व ती 15 एचपी पावर जनरेट करते. या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची पीटीओ पावर 9.46 एचपी असून कंपनीचा हा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर 500 किलो लोडिंग क्षमतेसहित येतो. या सोनालिकाच्या ट्रॅक्टरमध्ये सहा फॉरवर्ड अधिक दोन रिव्हर्स गिअर बॉक्स असून यामध्ये मेकॅनिकल स्टेरिंग देण्यात आलेली आहे. हा ट्रॅक्टर दहा तासांच्या चार्जिंगमध्ये आणि चार तासांच्या फास्ट चार्जिंगमध्ये पूर्ण चार्ज होऊ शकतो. या सोनालीका टायगरचे भारतात किंमत पाच लाख 91 हजार रुपये ते 6 लाख 22 हजार रुपये( एक्स शोरूम) ठेवण्यात आली आहे.

2- ऑटोनेक्स्ट X45H2 ट्रॅक्टर-या ट्रॅक्टरमध्ये 32KW बॅटरी क्षमता असलेली शक्तिशाली मोटर देण्यात आलेली असून जी 45 एचपी पावर निर्माण करते. ह्या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची लोडिंग क्षमता 800 किलो इतकी ठेवण्यात आलेली आहे. यामध्ये स्मार्ट इलेक्ट्रिकली कंट्रोल पावर स्टेरिंग देण्यात आली आहे. हा ट्रॅक्टर आठ तास सामान्य चार्जिंग व दोन तास फास्ट चार्जिंगसह सादर करण्यात आला आहे. हा कंपनीचा 2WD इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आहे. या ट्रॅक्टरचे भारतातील किंमत ही सहा लाख 40 हजार रुपये ते 6 लाख 72 हजार रुपये( एक्स शोरूम) ठेवण्यात आली आहे.

3- सेलेस्टीयल 55 एचपी ट्रॅक्टर- हा सेलेस्ट्रियल कंपनीचा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर शक्तिशाली मोटरसह सादर करण्यात आला असून या माध्यमातून 55 एचपी हॉर्स पावर जनरेट केली जाते. या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची वजन उचलण्याची क्षमता चार हजार किलो इतकी ठेवण्यात आली आहे. हे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर 30 किलोमीटर प्रतितास वेगाने धावू शकतो व यामध्ये पावर स्टेरिंग देण्यात आले आहे. सेलेस्टीयलचा हा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर पाच तासांच्या सामान्य चार्जिंग सह आणि एक तास जलद चार्जिंग सह पूर्णपणे चार्ज होतो. हा फोर व्हील ड्राईव्ह ट्रॅक्टर आहे. या ट्रॅक्टरची भारतातील किंमत पाच लाख रुपये( एक्स शोरूम) ठेवण्यात आली आहे.

4- ऑटोनेक्स्ट X35H2 ट्रॅक्टर- या ट्रॅक्टरमध्ये 20 KW बॅटरी क्षमतेचे मजबूत मोटर दिलेली आहे. या ट्रॅक्टरच्या माध्यमातून 27 एचपी पावर जनरेट केली जाते. या ट्रॅक्टरमध्ये 1400 किलो वजन उचलण्याची क्षमता दिली असून यामध्ये हायड्रोलिक पावर स्टेरिंग दिसू शकते. ट्रॅक्टर नॉर्मल चार्जिंगमध्ये आठ तास आणि फास्ट चार्जिंगमध्ये दोन तासात पूर्ण चार्ज होतो. भारतामध्ये या ट्रॅक्टरची एक्स शोरूम किंमत सहा लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

5-HAV 45 S1 ट्रॅक्टर- या ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला शक्तिशाली 4TNV84 इंजिन दिले असून ते 44 एचपी पावरसह 3000 आरपीएम जनरेट करते. हा ट्रॅक्टर भविष्यातील तयार इलेक्ट्रिक ट्रॅक्टर असून बॅटरी पॅकशिवाय एकमेव हायब्रीड ट्रॅक्टर आहे. हा इंधनावर देखील चालू शकतो. या ट्रॅक्टरचे वजन उचलण्याची क्षमता 1800 किलो इतकी आहे. या ट्रॅक्टरमध्ये मॅक्स कव्हर टाईप स्टेरिंग देण्यात आलेले आहे. हा ट्रॅक्टर चार व्हील ड्राईव्ह मध्ये येतो. या ट्रॅक्टरची एक्स शोरूम किंमत आठ लाख 49 हजार रुपये ठेवण्यात आली आहे.