Top SUV Car:- भारतातील कार बाजारपेठ खूप मोठी असून भारतातील आणि जगातील विविध कार उत्पादक कंपन्या भारतीय बाजारपेठेमध्ये अनेक नवनवीन असे कार मॉडेल्स लाँच करत असते. यामध्ये जर गेल्या तीन ते चार वर्षाचा विचार केला तर भारतीय बाजारपेठेमध्ये एसयूव्ही कारची विक्री खूप मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून येते.
कारण या गाड्यांमध्ये असलेली सुरक्षिततेची वैशिष्ट्ये, आरामदायी रचना इत्यादी वैशिष्ट्यांमुळे अनेक लोक आता एसयुव्ही कार खरेदी करण्याला प्राधान्य देतात.
भारतीय बाजारपेठेमध्ये अनेक एसयुव्ही कार मॉडेल्स आहेत. परंतु यातील काही मॉडेल्स असे आहेत की प्रत्येक महिन्याला त्यांची विक्री खूप मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे या लेखात आपण अशाच काही एसयूव्ही कार पाहणार आहोत की ज्या भारतामध्ये सर्वाधिक विकले जातात.
भारतातील टॉप सर्वात्कृष्ट एसयूव्ही कार
1- टाटा पंच– टाटा मोटर्सची टाटा पंच ही एसयुव्ही कार सर्वात विक्री होणारी कार असून मार्च महिन्यामध्ये देखील ही सर्वाधिक विकली गेली होती. आकडेवारी पाहिली तर मार्च महिन्यामध्ये 17547 युनिट विकल्या गेल्या होत्या. टाटा पंचची किंमत सहा लाख रुपयापासून सुरू होते आणि नऊ लाख 52 हजार( एक्स शोरूम) रुपयांपर्यंत जाते. या कारमध्ये 1.2 लिटर तीन सिलेंडर पेट्रोल इंजिन असून ते 88 बीएचपीची कमाल पावर आणि 115 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते.
2- ह्युंदाई क्रेटा– ही देशातील सर्वात लोकप्रिय अशी एसयूव्ही कार असून मार्च 2024 मध्ये या कारचे 16,458 युनिट विकले गेले होते. ह्युंदाई क्रेटाचे फेसलिफ्ट मॉडेल लोकांनी खूप पसंत केले होते. विशेष म्हणजे क्रेटाने विक्रीच्या बाबतीत टाटा नेक्सनला देखील मागे टाकले असून या कारची किंमत अकरा लाख रुपये( एक्स शोरूम) पासून सुरु होते.
3- महिंद्रा स्कॉर्पिओ– महिंद्रा स्कॉर्पियो देखील ग्राहकांमध्ये खूप महत्त्वाचे असून गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांपासून तर व्हीआयपी लोकांपर्यंत या कारने प्रसिद्धी मिळवलेली आहे. मार्च 2024 मध्ये महिंद्रा स्कार्पियोचे 15151 युनिट विकले गेले होते. महिंद्रा कंपनी स्कॉर्पिओ श्रेणीमध्ये स्कार्पिओ क्लासिक आणि स्कार्पिओ एन या दोन कार विकत आहे.
4- मारुती सुझुकी ग्रँड विटारा– ग्रँड विटाराचे वैशिष्ट्य म्हणजे ही मध्यम आकाराची एसयूव्ही हायब्रीड इंजिनमध्ये येते. तसेच या कारचे मायलेज देखील चांगले असल्याने विक्री देखील मोठ्या प्रमाणावर होत आहे. मार्च 2024 ची
आकडेवारी पाहिली तर ग्रँड विटाराचे जवळपास 11 हजार 232 युनिट विकले गेले होते व या कारची एक्स शोरूम किंमत दहा लाख 80 हजार रुपयांपासून सुरू होते.
5- महिंद्रा बोलेरो– महिंद्राची 7 सीटर एसयुव्ही बोलेरोचा देखिल टॉप यादीमध्ये समावेश होतो व मार्च महिन्यात बोलेरोच्या दहा हजार 347 कारची विक्री झाली होती. गेल्या 15 ते 20 वर्षापासून भारतीय बाजारपेठेत महिंद्र बोलेरोने मजबूत पकड तयार केलेली आहे व या कारची एक्स शोरूम किंमत नऊ लाख 90 हजार रुपयांपासून सुरू होते.