घोडेगाव कांदा मार्केटमध्ये 50 हजाराहून अधिक कांदा गोण्यांची आवक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :-  नेवासा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये विक्रमी कांदा गोण्यांची आवक झाली आहे. विशेषबाब म्हणजे सोमवारच्या तुलनेत कांदा आवकेत 8 हजार गोण्यांनी वाढ झाली आहे.(Ahmednagar onion news)

बुधवारी 54 हजार 620 गोण्या कांदा लिलावासाठी आला होता. भाव जास्तीत जास्त 3500 रुपयांपर्यंत निघाले असून सोमवारच्या तुलनेत भाव 100 रुपयांनी घसरले.

जाणून घ्या कांद्याला मिळालेला भावदर

मोठ्या मालाला 3200 ते 3300 रुपये भाव मिळाला.

मध्यम मोठ्या मालाला 3000 ते 3200 रुपये भाव मिळाला.

गोल्टी कांद्याला 1900 ते 2000 रुपये भाव मिळाला.

गोल्टा कांद्याला 2100 ते 2200 रुपये भाव मिळाला.

जोड कांद्याला 400 ते 500 रुपये भाव मिळाला

एक-दोन वक्कलांना 3400 ते 3500 रुपये इतका भाव मिळाला

नवीन मालाला 500 ते 2800 रुपयांपर्यंत भाव मिळाला.