Soybean Market Update: सोयाबीनची बाजारपेठेतील आवक कमी तरीही भाव वाढ मात्र नाही!कधी येणार सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Market Update:- यावर्षीच्या हंगामामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर बाजार भावाच्या बाबतीत निराशा झाल्याची स्थिती आहे. अजून देखील सोयाबीन बाजारभावाची स्थिती सुधारण्याचे कुठल्याही प्रकारचे चिन्ह नसून चालू हंगामात सुरुवातीपासूनच सोयाबीन बाजाराने  शेतकऱ्यांची जणू परीक्षा घेतली आहे अशी स्थिती आहे.

यातच आता सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडिया( सोपा) ने मार्च महिन्याचा अहवाल जाहीर केला असून यामध्ये चालू हंगामातील देशातील सोयाबीन उत्पादनाचा अंदाज हा 118 लाख टनांवर कायम ठेवण्यात आला आहे. या व्यतिरिक्त या अहवालात काय म्हटले आहे? यासंबंधीची माहिती आपण या लेखात बघू.

 सोपाने जाहीर केला मार्च महिन्याचा सोयाबीन अहवाल

देशामध्ये ऑक्टोबर 2023 ते फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये सोयाबीनची आवक कमी राहिली. परंतु त्यासोबतच सोयाबीनची गाळप तसेच सोयाबीनची निर्मिती देखील कमी राहिली. देशांतर्गत सोयापेंडचा वापर कमी राहिला मात्र निर्यात गेल्या वर्षी याच काळातील निर्यातीपेक्षा जास्त राहिली अशा प्रकारचा अंदाज सोपाने व्यक्त केला आहे.

तसेच सोपाच्या माध्यमातून मार्च महिन्याचा सोयाबीन अहवाल जाहीर करण्यात आलेला असून या अहवालामध्ये फेब्रुवारीच्या अखेरपर्यंतची बाजारातील आवक, झालेली सोयाबीनचे गाळप तसेच सोयापेंडची निर्मिती व निर्यात व देशातील सोयाबीनचा वापर इत्यादी बाबत अंदाज देण्यात आला आहे.

एवढेच नाही तर या चालू हंगामातील देशातील सोयाबीन उत्पादनाचा अंदाज हा 118 लाख टनांवर कायम ठेवण्यात आला आहे. तसेच मागील हंगामातील शिल्लक साठा हा 24 लाख टन असल्याचे म्हटले असून

यामधून पेरणीसाठी बियाणे तसेच सोयाबीनचा थेट वापर आणि 115 लाख टनांचे गाळप गृहीत धरले तरी पुढील हंगामासाठी तब्बल 15 लाख टनांचा शिल्लक साठा राहील असे देखील या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

 सोयापेंड बाबत अहवालात काय म्हटले आहे?

यावर्षी सोयाबीनचे उत्पादन 91 लाख टनांवर होण्याचा अंदाज असून देशांतर्गत वापर 68 लाख टनांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी देशांतर्गत वापर हा एक लाख टन इतका वाढेल असा अंदाज आहे.

तसेच 14 लाख टन सोयाबीन देशातून निर्यात होण्याची शक्यता असून सोयाबीनचा थेट वापर आठ लाख टन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 यावर्षी झालेल्या सोयाबीन आवकची स्थिती

देशामध्ये यावर्षी ऑक्टोबर ते फेब्रुवारी महिन्याच्या शेवटपर्यंत जवळपास 70 लाख टन सोयाबीनची आवक झाली होती. परंतु यावर्षी ऑक्टोबर वगळता इतर चार महिन्यांमध्ये मासिक आवक मागच्या वर्षी पेक्षा कमीच राहिली.

एकट्या फेब्रुवारी महिन्याचा विचार केला तर फेब्रुवारीमध्ये आठ लाख टन सोयाबीनची आवक झाली. परंतु मागच्या वर्षी फेब्रुवारीत दहा लाख टन आवक झाली होती. म्हणजे ही आवक मागच्या वर्षीच्या तुलनेत तब्बल दोन लाख टन कमी राहिली. तसेच सोयाबीनचे आयात एक लाख टनांची झाली.

 गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी सोयापेंड निर्मितीत घट

चालू हंगामामध्ये फेब्रुवारी महिन्याच्या शेवटपर्यंत जवळपास 41 लाख 43 हजार टन सोयाबीनची निर्मिती करण्यात आली. मात्र गेल्यावर्षीपेक्षा सोयापेंड निर्मिती तीन लाख टन यावर्षी कमी झाली.

तसेच सोया पेंडचा देशातील वापर देखील सव्वा लाख टनांनी कमी झाला. निर्यात मात्र 42 हजार टनांनी वाढली व ती नऊ लाख टनावर पोचली असल्याचे देखील सोपाच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले आहे.