Soybean Market Price : शेतकऱ्यांमागची साडेसाती कधी संपेल! सोयाबीन दरात पुन्हा घसरण, आजचे सोयाबीन बाजारभाव वाचा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Market Price : सोयाबीन (Soybean Crop) हे महाराष्ट्रातील एक प्रमुख पीक आहे. या पिकाची आपल्या राज्यातील शेतकरी (Farmer) मोठ्या प्रमाणात लागवड करतात. राज्यातील बहुतांश शेतकरी बांधवांचे सर्व अर्थकारण सोयाबीन या नगदी पिकावर (Cash Crop) अवलंबून असते.

मात्र गेल्या काही दिवसांपासून सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवाना सोयाबीनच्या दरात होत असलेली घसरण पाहता आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या (Soybean Grower Farmer) मते, सोयाबीनला मिळत असलेला बाजारभाव (Soybean Rate) हा अतिशय नगण्य असून यामुळे सोयाबीन पिकासाठी आलेला उत्पादन खर्च काढणे देखील मुश्कील आहे.

मित्रांनो खरे पाहता गेल्या महिन्याभरापूर्वी सोयाबीन पिकाला सहा हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव मिळत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून यामध्ये सातत्याने घसरण होत आहे. गत आठवड्यात तर सोयाबीनला या हंगामातील सर्वात कमी बाजार भाव मिळाला होता.

सोयाबीनला गत आठवड्यात मात्र तीन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळत होता. मात्र आता यामध्ये सुधारणा झाली असून सोयाबीनचे बाजार भाव साडे पाच हजाराच्या आसपास आहेत. मात्र असे असले तरी सध्या मिळत असलेले बाजार भाव तुलनेने खूपच कमी आहेत.

यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधव भाववाढीची वाट पाहत आहेत. दरम्यान आता बाजारात नवीन सोयाबीन देखील दाखल झाला आहे. शिवाय आगामी काही काळात नवीन सोयाबीनची आवक देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. अशा परिस्थितीत सोयाबीनचे बाजार भाव सुधारतील का? हा मोठा प्रश्न सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भेडसावत आहे.

मित्रांनो आपण रोजच सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी सोयाबीनचे नवीन बाजार भाव घेऊन हजर होत असतो. आज देखील आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळालेल्या बाजारभावाविषयी चर्चा करणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.

कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- कारंजा एपीएमसीमध्ये आज 2200 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. या एपीएमसीमध्ये झालेल्या लिलावात आज सोयाबीनला चार हजार 950 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 455 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज झालेल्या लिलावात कारंजा एपीएमसीमध्ये 5225 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव सोयाबीनला मिळाला आहे.

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती :- हिंगोली एपीएमसीमध्ये आज 299 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. या एपीएमसीमध्ये झालेल्या लिलावात आज सोयाबीनला 4805 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5251 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज झालेल्या लिलावात हिंगोली एपीएमसीमध्ये 5028 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव नमूद करण्यात आला आहे.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- अकोला एपीएमसीमध्ये आज 268 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात अकोला एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 370 रुपये प्रति क्विंटल एवढा कमल बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज झालेल्या लिलावात अकोला एपीएमसीमध्ये 5255 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.

चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती :- चिखली एपीएमसीमध्ये 83 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात चिखली एपीएमसीमध्ये 4700 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5112 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज झालेल्या लिलावात चिखली एपीएमसीमध्ये 4906 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव नमूद करण्यात आला आहे.

बीड कृषी उत्पन्न बाजार समिती :- बीड एपीएमसीमध्ये आज 65 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात बीड एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार 717 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज झालेल्या लिलावात बीड एपीएमसीमध्ये 5089 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव सोयाबीन ला नमूद करण्यात आला आहे.

गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समिती :- गंगाखेड एपीएमसीमध्ये आज सोयाबीनची 16 क्‍विंटल आवक झाली आज झालेल्या लिलावात गंगाखेड एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 300 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज गंगाखेड एपीएमसीमध्ये झालेल्या लिलावात सोयाबीनला पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.

उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समिती :- उमरखेड एपीएमसीमध्ये आज पन्नास क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात उमरखेड एमपीएमसी मध्ये सोयाबीनला पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज उमरखेड एपीएमसी मध्ये झालेल्या लिलावात सोयाबीनला पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव नमूद करण्यात आला आहे.