Soybean Market Price : ब्रेकिंग! ‘या’ एपीएमसीमध्ये सोयाबीनच्या बाजारभावात सुधारणा; वाचा आजचे सोयाबीन बाजारभाव

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Market Price : गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात घसरण होत असल्याचे चित्र आहे. एका महिनाभरापूर्वी सहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत विक्री होणारा सोयाबीन (soybean crop) साडे पाच हजाराच्या खाली आला असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांची (farmer) डोकेदुखी वाढली आहे.

यामुळे आगामी काही दिवसात नवीन सोयाबीन बाजारात आला तर चांगला बाजार भाव (soybean rate) मिळेल का अशी संभ्रमावस्था देखील शेतकऱ्यांमध्ये बघायला मिळत आहे. मित्रांनो जस की आपणास ठाऊकच आहे सोयाबीन हे एक नगदी पीक आहे आणि या पिकाची आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात शेती (soybean farming) केली जाते.

अशा परिस्थितीत राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधवांचे सर्व अर्थकारण सोयाबीन या नगदी पिकावर (cash crop) अवलंबून असते. त्यामुळे आम्ही आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी रोजच सोयाबीनच्या बाजार भावाची बहुमूल्य माहिती घेऊन हजर होत असतो. आज देखील आपण 31 ऑगस्ट 2022 रोजी सोयाबीनला मिळालेल्या बाजारभावाविषयी चर्चा करणार आहोत. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया आजचे सोयाबीन बाजार भाव. 

राहता कृषी उत्पन्न बाजार समिती:- आज राहता एपीएमसीमध्ये 27 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. या एपीएमसीमध्ये आज पाच हजार 361 रुपये प्रति क्विंटल एवढा सोयाबीनला कमाल बाजार भाव मिळाला असून 5200 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव या एपीएमसीमध्ये सोयाबीनला मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5 हजार 280 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती:- अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 2067 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज या बाजार समितीमध्ये 5,895 रुपये प्रति क्विंटल एवढा सोयाबीनला कमाल बाजार भाव मिळाला असून किमान बाजार भाव 5 हजार शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे. तसेच पाच हजार 380 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव या एपीएमसीमध्ये सोयाबीनला मिळाला आहे.

पैठण कृषी उत्पन्न बाजार समिती:- पैठण एपीएमसीमध्ये आज सहा क्विंटल सोयाबीनची आवक झाली. या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार 971 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला असून किमान बाजारभाव चार हजार 971 आणि सर्वसाधारण बाजार भाव देखील तेवढाच राहिला आहे.