Soybean Market Price : सोयाबीन बाजाराला लागली साडेसाती ! आज देखील सोयाबीन 6 हजाराच्या खालीच, आजचे सोयाबीन बाजारभाव जाणून घ्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Market Price : सोयाबीनच्या बाजार भावात (Soybean Rate) गेल्या काही दिवसांपासून सतत पडझड सुरू असल्याचे चित्र आहे. मित्रांनो जस की आपणास ठाऊकच आहे सोयाबीन लागवडीखालील (Soybean Farming) क्षेत्र महाराष्ट्रात विशेष उल्लेखनीय आहे.

अशा परिस्थितीत सोयाबीन पिकावर (Soybean Crop) महाराष्ट्रातील बहुतांशी शेतकरी बांधवांचे (Farmer) अर्थकारण अवलंबून असते. अशा परिस्थितीत सोयाबीन बाजाराकडे (Soybean Price) शेतकरी बांधवांचे मोठे बारीक लक्ष लागून असते.

यामुळे आम्ही आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी रोजच सोयाबीनच्या बाजार भावाची माहिती घेऊन हजर होत असतो. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया आज सप्टेंबर महिन्यातील पहिल्या दिवसाचे बाजारभाव.

उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती:- या एपीएमसीमध्ये आज सोयाबीनची 820 क्विंटल आवक झाली. या एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार 552 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला असून पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव पाच हजार 526 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती:- सोयाबीन बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या कारंजा एपीएमसीमध्ये देखील आज सोयाबीनच्या दरात मामुली घसरण बघायला मिळाली. या एपीएमसीमध्ये आज 2500 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. या एपीएमसीमध्ये आज पाच हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव सोयाबीनला मिळाला असून पाच हजार 440 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव सोयाबीनला मिळाला आहे. तसेच पाच हजार 175 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव सोयाबीनला मिळाला आहे.

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती :- अमरावती एपीएमसीमध्ये आज 2820 क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. या एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5281 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव सोयाबीन मिळाला आहे. तसेच पाच हजार 140 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव सोयाबीनला मिळाला आहे.

मेहकर कृषी उत्पन्न बाजार समिती:- मेहकर एपीएमसीमध्ये आज 590 क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे. या एपीएमसीमध्ये आज पाच हजार 280 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव सोयाबीन ला मिळाला असून साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव सोयाबीन मिळाला आहे. तसेच पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा सोयाबीनला सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती:-  अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 988 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. या बाजार समितीमध्ये आज पाच हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव सोयाबीन ला मिळाला असून 5625 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव सोयाबीनला मिळाला आहे. तसेच पाच हजार 390 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव सोयाबीन मिळाला आहे.

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- नागपूर एपीएमसीमध्ये 123 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4705 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून कमाल बाजार भाव पाच हजार 180 रुपये प्रति क्विंटल एवढा मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5 हजार 61 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.