कॉलेज तरुणाला मारहाण ! सोशल मिडियावर व्हिडीओ व्हायरल…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :-  श्रीगोंदे शहरातील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात अकरावी कला शाखेत शिकणाऱ्या एका तरुणाला वर्गात शिकत असताना बेंचवर बसण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून मारहाण करण्यात आली.

त्या तरुणाला बांधून बेदम मारहाण करत, त्याचे चित्रीकरण करून, तो व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर अपलोड करण्यात आला. या बाबत श्रीगोंदे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

मारहाण करणाऱ्या दोन युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चित्रिकरण करणाऱ्या व घेऊन जाणाऱ्या निळ्या रंगाचा मोपेड गाडीचा पोलिस तपास करत आहेत.

श्रीगोंदे शहरातील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात अकरावी कला शाखेत शिकणाऱ्या ओमकार गलांडे या घुगलवडगाव येथील युवकाला ७ डिसेंबरला दुपारी साडेतीनच्या सुमारास कॉलेज सुटल्यानंतर कॉलेज बाहेरील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या दोन अल्पवयीन मुलांनी पेट्रोल पंपावर जाऊ, तुझ्याकडे एक काम आहे असे म्हणत, त्यांचे कडील मोपेड गाडी वरून बसवून नेले.

ईसार पेट्रोल पंपा शेजारी श्रीगोंदे फॅक्टरी रोड लगत असलेल्या बागेत घेऊन गेले अन ओंकारला दम दिला की, तुझ्या वर्गातील अश्पाक सय्यद व कपिल शेख यांचे सोबत का भांडण केले?

म्हणून, शिवीगाळ करत पडलेल्या लाकडी काठ्या घेऊन ओंकारला मारहाण करण्यात आली. यामध्ये ओंकार गंभीर जखमी झाला आहे.

आमच्या नादी लागला तर तुला श्रीगोंद्यात येणे कठीण करून टाकु, असा दमही त्याला दिला. हे सर्व होत असताना ओंकारला रस्सीने हाताला बांधले व पडलेल्या लाकडी दांड्याने त्याला जबरी मारहाण केली.

या सर्वाचं चित्रीकरणही तेथे मारहाण करणाऱ्या मित्रांनी केले आणि हा मारहाणीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर टाकण्यात आला.

बाकावर बसण्याच्या किरकोळ कारणावरून वाद झाला होता. हा वाद आपापसात मिटला होता. परंतु, या वादाचा आधार घेत पीडित ओंकारला जबरी मारहाण करून,

त्याचा व्हिडिओ बनवला व सर्व कॉलेजमध्ये दहशत पसरवण्याचे काम केले. याबाबत ओंकारने श्रीगोंदे पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.